• Download App
    प्रकाश आंबेडकरांना जरांगेंचे प्रत्युत्तर, सत्याला धरून बोला, मराठ्यांना आरक्षण मिळू नये, असे शब्द नको, सर्वांची बाजू मांडा|Jarang's reply to Prakash Ambedkar, speak the truth, don't say that Marathas shouldn't get reservation, stand up for everyone

    प्रकाश आंबेडकरांना जरांगेंचे प्रत्युत्तर, सत्याला धरून बोला, मराठ्यांना आरक्षण मिळू नये, असे शब्द नको, सर्वांची बाजू मांडा

    विशेष प्रतिनिधी

    जालना : वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रा काढणार असल्याची घोषणा केली. सध्या जरांगे पाटील जी सगेसोयरेची मागणी करत आहेत, ती भेसळ आहे. त्यांची मागणी आम्हाला न पटणारी आहे, असेही आंबेडकरांनी भूमिका मांडली. त्यावर आता जरांगे पाटील यांनी प्रत्युत्तर दिले आहे.Jarang’s reply to Prakash Ambedkar, speak the truth, don’t say that Marathas shouldn’t get reservation, stand up for everyone

    काय म्हणाले जरांगे पाटील?

    प्रकाश आंबेडकर यांच्या भूमिकेवर बोलताना जरांगे पाटील म्हणाले की, मंत्र्यांनी न्यायाधीशांनी आणि कायद्याच्या अभ्यासकांनी मिळून ठरवलेले आहे. आणि आमची मागणी ही पक्की असून ती टिकणार सुद्धा, सगेसोयरेची मागणीतून सगळ्या जाती-धर्मांना न्याय मिळणार आहे.



    सगेसोयरे ते जर भेसळ असेल, तर 50%च्या वर दोन टक्के दिलेल आहे हेही भेसळच असणार आहे. 180 जाती आरक्षणात घातल्या होत्या आता साडेतीनशे-चारशे जाती झाल्या, त्याही भेसळ असतील मग घातलेल्या. त्यावर देखील आंबेडकर साहेबांनी बोलायला पाहिजे. एक्सट्रा जाती कुठून आल्या. प्रकाश आंबेडकर साहेबांनी भेसळ शब्द वापरण्यापेक्षा बोगस शब्द वापरावा, असे जरांगे पाटील म्हणाले.

    त्यांनी चौफेर टाईट बोलावं

    मराठा समाज संपवावा किंवा त्यांना आरक्षण मिळू नये याबाबतचे शब्द त्यांच्याकडून येऊ नये. त्यांच्याकडून सगळ्यांना सारखं चौफेर टाईट बोलण्यात यावं. सगळ्यांची सारखी बाजू त्यांच्याकडून मांडण्यात आली पाहिजे. ही जनतेची अपेक्षा आहे, त्यापेक्षा माझी जास्त आहे. सगळ्या जाती धर्मातले लोक त्यांना याच कारणाने मानतात की ते अगदी स्पष्ट बोलतात. खरं जे आहे ते बोलतात. एवढीच आमची त्यांच्याकडून अपेक्षा आहे. त्यांनी सगळीकडून सारखी मांडणी करावी एवढीच आमची अपेक्षा आहे.

    दरम्यान, राज्यात शांतता नांदावी, ओबीसींचे आरक्षण कायम रहावे, ही प्रमुख मागणी करत मंगळवारी वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आरक्षण बचाव यात्रेची घोषणा केली. ते छत्रपती संभाजीनगरमध्ये बोलत होते. येत्या 25 जुलैपासून ही यात्रा काढण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

    Jarang’s reply to Prakash Ambedkar, speak the truth, don’t say that Marathas shouldn’t get reservation, stand up for everyone

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस