• Download App
    मुख्यमंत्री शिंदेंच्या हातून ज्यूस पिऊन जरांगेंनी सोडले उपोषण; जीआर स्वीकारला, सरकारला विरोध संपला|Jarangs break fast by drinking juice from Chief Minister Shinde; GR accepted, opposition to Govt ends

    मुख्यमंत्री शिंदेंच्या हातून ज्यूस पिऊन जरांगेंनी सोडले उपोषण; जीआर स्वीकारला, सरकारला विरोध संपला

    विशेष प्रतिनिधी

    वाशी : मराठा आरक्षणाच्या मागणीबाबत सरकारला अल्टिमेटम देणारे मनोज जरांगे यांनी आंदोलन मागे घेतले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्युस घेत मनोज जरांगे पाटील यांनी उपोषण सोडले आहे. तर सीएम शिंदेंच्या हस्ते त्यांनी पत्रही स्वीकारले आहे.Jarangs break fast by drinking juice from Chief Minister Shinde; GR accepted, opposition to Govt ends

    मराठा आरक्षणाचे कार्यकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्र सरकारला त्यांच्या मागण्यांबाबत अधिसूचना काढण्यासाठी 24 तासांची मुदत दिली होती. त्याचवेळी आता मनोज जरांगे म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आमचा विरोध आता संपला आहे. त्यांनी आमची विनंती मान्य केली आहे.



    याआधी काल मनोज जरांगे पाटील यांनी शनिवारी सकाळी 11 वाजेपर्यंत सरकारला अल्टिमेटम दिला होता. ते म्हणाले- 11 वाजेपर्यंत आरक्षणाचा अध्यादेश जारी करा, अन्यथा 12 वाजता मुंबईतील आझाद मैदानावर पोहोचून आंदोलन सुरू करू, पण रात्रीतून मोठ्या घडामोडी झाल्या आणि सरकारने सर्व मागण्या मान्य केल्याने मनोज जरांगे पाटील यांनी आंदोलन मागे घेतल्याचे जाहीर केले आहे.

    मनोज जरांगे पाटील म्हणाले की, आपल्याला अपेक्षित सर्व गोष्टी सरकारने मान्य केल्या आहेत.आपण उद्या सर्व जण गुलाल उधळून आपण गावी वापस जाणार आहोत, असे सांगतानाच आम्ही विजयी सभा घेणार असल्याचे मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.

    यात पुन्हा शिंदे समिती काम करणार आहे, असे अनेक मुद्यांवर सरकारने निर्णय घेतला आहे, मराठा ​​​​​​आरक्षणासाठी सर्व समाजाने मेहनत घेतली. मुंबईत मराठे दाखल झाल्याने हा निर्णय झाला. मी यापुढेही मराठा समाजासाठी लढत राहणार आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे. तर आंदोलन स्थगित केल्याचेही त्यांनी म्हटले आहे.

    समाज म्हणून आमचा आता एकनाथ शिंदे यांचा विरोध संपला आहे. वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौकात मुख्यमंत्री पत्र घेऊन येणार आहेत, असे मनोज जरांगेंनी सांगितले आहे. तसेच, मी सगळ्यांना विचारून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना बोलावले आहे. आम्ही येथे सभा घेणार असून मुंबईत जाणार नसल्याचे मनोज जरांगेंनी स्पष्ट केले आहे. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ज्यूस पिऊन उपोषण सोडणार असल्याचंही मनोज जरांगेंनी यावेळी जाहीर केले आहे.

    मनोज जरांगे पाटील म्हणाले की, वंशावळीसाठी तालुका पातळीवर समिती नेमली जाणार आहे. मराठवाड्यात कमी प्रमाण पत्र सापडले त्या बाबत आता शिंदे समिती गॅझेट काढून त्यावर काम करणार आहे. तसेच विधानसभेत यावर कायदा करण्यात येणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आमचे आरक्षणचे काम केले आहे.

    मुख्यमंत्र्यांचा विरोध संपला…

    मनोज जरांगे पाटील म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी चांगले काम केले आहे. आपला त्यांना विरोध संपला आहे. आपली मागणी मान्य झाली आहे. आपल्याला विरोध करणाऱ्यांना आपण विरोध होता. समाज म्हणून आपला विषय संपला आहे. मी मुख्यमंत्री यांच्या हस्ते जूस स्वीकारणार आहे. आपण त्यांच्या हस्ते पत्र स्वीकारणार आहोत. समाजाला मी मायबाप मानले आहे. मी तुम्हाला विचारून निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्र्यांना बोलवू का? यावर सर्वांनी होकार दिल्याने मी निर्णय घेतला आहे. सर्व खुट्या मी उपटल्या आहेत. मला विजयी सभा प्रचंड मोठी घ्यायची आहे. ती तारीख लवकर घोषित करणार, असल्याचे जरांगे म्हणाले.

    Jarangs break fast by drinking juice from Chief Minister Shinde; GR accepted, opposition to Govt ends

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!