विशेष प्रतिनिधी
बीड : Jarange मराठा आरक्षणासाठी ही शेवटची लढाई आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आम्ही माघारी फिरणार नाही, आरक्षणाचा गुलाल उधळूनच यायचे, असे प्रतिपादन मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी केले. मुंबईतील आझाद मैदानात २९ ऑगस्ट रोजी होणाऱ्या धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर बीडच्या मांजरसुंबा येथे झालेल्या बैठकीत ते बोलत होते. राजकारण्यांचे ऐकून घरी थांबू नका, प्रत्येकाने मुंबईला या, असे आवाहन त्यांनी केले. आंदोलन शांततेच्या मार्गाने होणार आहे. पण मुंबईत आलेल्या एकाही आंदोलकाला काठी जरी लागली तर महाराष्ट्रात एकाही भाजप आमदाराला रस्त्यावर फिरू द्यायचे नाही, असा इशाराही जरांगे यांनी दिला.Jarange
आंदोलनासाठी २७ तारखेला सकाळी आपल्याला जालन्याच्या आंतरवाली सराटी येथून एकत्र निघायचे आहे आणि २९ तारखेला शांततेत मुंबईमध्ये जायचे आहे, असे बैठकीत जरांगे यांनी आंदोलकांना सांगितले. या वेळी एकाही मराठ्याने घरी राहायचे नाही. राजकीय नेत्यांचे ऐकून घरी थांबू नका. सरकारने आरक्षण दिले, मागण्या मान्य केल्या तर आम्ही मुंबईला कशाला येऊ? इथूनच मंत्रालयावर गुलाल उधळू असेही त्यांनी नमूद केले. मी मरणापर्यंत येऊन टेकलोय, उपाशा-तापाशी राहतो, रक्त जाळतो पण एक इंचही मागे सरकत नाही. तुमच्या लेकरांसाठी लढतोय. आरक्षणासाठी आता ही शेवटची लढाई आहे. मी मरण्याला घाबरत नाही. आता माघार नाही. आरक्षण घेऊनच परत यायचे आहे, असेही त्यांनी स्पष्ट केले.Jarange
मुंबईला सर्वांनी शांततेत जायचे आहे. मला जाळपोळ, दगडफेक मान्य नाही. मी तुम्हाला शांततेत आरक्षण मिळवून देतो. मला समाजातील एकही लेकरू वाया जाऊ द्यायचे नाही. जाळपोळ करणारे आपली पैदास नाही, लक्षात ठेवा. सरकार कारस्थान करून असे लोक आपल्यात घालतील. वेळ पडली तर त्यांना आपल्या घोषणा द्यायला लावतील. दगड हाणा म्हणतील. पण दगडफेक झाली तरी सरळ चालायचे. मराठ्यांच्या डोक्यावर आरक्षणाचा गुलाल उधळायचा. मागे फिरायचे नाही, असे आवाहन त्यांनी आंदोलकांना केले. मुंबईला येताना तुम्ही कुणावरही अवलंबून राहू नका, पीठ-मीठ घेऊन या. पाऊस असल्याने छत्र्याही घेऊन या, असेही जरांगेनी आंदोलकांना सांगितले.
डीजेबंदीवरुन एसपी, डीवायएसपींना इशारा
बीडच्या इशारा सभेत डीजे वाजवू दिला नसल्याने मनोज जरांगे चांगलेच संतापले. ते म्हणाले, आमचा डीजे वाजवू दिला नाही. यापुढे बीडमध्ये कोणाचाही डीजे वाजवू देणार नाही. सत्तेचा वापर करून आम्हाला डीजे वाजवू दिला गेला नाही. आता आम्हाला नडणाऱ्या पोलिसांचा बाजार उठवायला मला वेळ लागणार नाही.
सगेसोयऱ्यांनाही आरक्षण मिळावे
मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मिळावे, सगेसोयऱ्यांसाठीही आरक्षण लागू व्हावे. सातारा व हैदराबादचे गॅझेट लागू करावे. ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्यात, त्यांना प्रमाणपत्र देण्याची प्रक्रिया करावी यासह इतर मागण्यांसाठी जरांगे यांच्या नेतृत्वाखाली येत्या २९ ऑगस्ट रोजी मुंबईतील आझाद मैदानात मराठा समाजाचे आंदोलन होणार आहे. त्यासाठी विविध जिल्ह्यांतून जरांगे समर्थक मुंबईत पोहोचणार आहेत.
मुंबईत ४० हजार पोलिसांची तैनाती
मुंबईत गणेशोत्सवासोबतच मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ३५ ते ४० हजार पोलीस तैनात केले जाणार आहेत. ४,५०० पेक्षा जास्त वाहतूक पोलीस वाहतूक सुरळीत ठेवतील आणि शहरातील ९,००० हून अधिक सीसीटीव्ही कॅमेऱ्यांद्वारे नजर ठेवली जाईल.
Jarange: This is the Last Battle for Maratha Reservation
महत्वाच्या बातम्या
- हिंदू धर्माचा अपमान सहन करणार नाही, नितेश राणेंची सुप्रिया सुळेंना ताकीद
- CJI BR Gavai : CJI म्हणाले- परीक्षेतील गुण-रँक यश निश्चित करत नाहीत; यासाठी कठोर परिश्रम आणि समर्पण आवश्यक
- राहुल गांधींची बिहारमध्ये सुरू आहे यात्रा; पण काँग्रेसच्या आमदाराने संतापातून बोलून दाखवली कर्नाटकातली हतबलता!!
- Karnataka : कर्नाटक- काँग्रेस आमदार केसी वीरेंद्रना EDकडून अटक; छाप्यात 12 कोटींची रोकड आणि 6 कोटींचे दागिने जप्त