• Download App
    20 जानेवारी पासून जरांगे पाटलांचे मुंबईत उपोषण; बीडच्या सभेतून इशारा Jarange Patil on hunger strike in Mumbai from January 20; A warning from the meeting of Beed

    20 जानेवारी पासून जरांगे पाटलांचे मुंबईत उपोषण; बीडच्या सभेतून इशारा

    विशेष प्रतिनिधी

    बीड : मराठा आरक्षणासाठी 20 जानेवारी 2024 पासून मनोज जरांगे पाटलांनी मुंबईतील आझाद मैदानात उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. बीडच्या इशारा सभेतून त्यांनी पुन्हा एकदा छगन भुजबळ यांच्यावर निशाणा साधला. Jarange Patil on hunger strike in Mumbai from January 20; A warning from the meeting of Beed

    मनोज जरांगे पाटील म्हणाले :

    देशातील मोठी जात संपवण्याचा तुमचा घाट दिसतो. एकदा जर मोठा समुदाय खवळला तर तुमचा सुपडा साफ होईल. तुमचं राजकीय अस्तित्व साफ होईल. माझ्या मराठ्यांना डिवचू नका. तुम्ही एकदा प्रयोग केलाय. तुम्हाला अंतरवलीचा प्रयोग भोगावा लागतोय. आता सावध व्हा. कोट्यवधी मराठा एकत्र आला आहे. सामंजस्याने ठरल्याप्रमाणे मराठा समाजाला आरक्षण द्या. त्याचं (छगन भुजबळ) ऐकून मराठ्यांवर अन्याय केला तर येणारं आंदोलन तुम्हाला जड जाईल. हा फक्त बीड जिल्हा आहे. अजून महाराष्ट्र बाकी आहे. जिल्ह्याला जिल्हे आणि घराला घर बाहेर पडणार आहे.

    सरकार झोपेचं सोंग घेत आहे. मराठा समाजाचा अपमान करत आहे. मराठा समाजाची फसवणूक करत आहेत. मराठा समाजाच्या जीवावर सत्ता मिळवतात आणि सत्ता मिळाल्यावर छगन भुजबळ सारख्यांना त्याचा लाभ दिला जात आहे.

    हे वादळ पाहून येवल्याच्या येडपटाला संडास लागल्याशिवाय राहणार नाही. मुंगीलाही जागा मिळणार नाही, एवढी ताकद मराठा समाजाने दाखवली. मराठा आरक्षण कसं आणतात ते नुसतच पाहा. आपल्याला डाग लागला. शांततेने आंदोलन करणाऱ्यांवर डाग लावला. कोणी म्हणतंय घरं जाळलीत. कोणी म्हणतंय हॉटेल जाळलंय. आमच्यावर उगाच डाग लावलाय. आम्ही घाबरणार नाही.

    नेता वगैरे मानू नका. आपल्यातील लोकांनी काम केलं तरच नेता माना. मराठा असला तरी नेता मानू नका. आता निवडणुकीत जवळ आला तर चप्पलच दाखवा. आपल्या जीवावर मोठं व्हायचं आणि आमचे मुडदे बघता. तुम्हाला लाजा वाटत नाही का? तुमच्या डोळ्यादेखत आरक्षणासाठी मराठ्याचं लेकरू आत्महत्या करत आहे. तुम्ही नुसतं पाहत आहात. एका दणक्यात आरक्षण द्या. नाटकं कशाला करता??

    आपल्या पोरांनी काही केलं नाही तरी गुन्हे दाखल केले आहेत. निष्पाप पोरांना अडकवण्याचं काम सरकारने केलं. मराठ्यांना काही करायचं असतं तर आजच केलं असतं. सरकार झोपू नका. मराठ्यांनी शांतता रॅली काढली होती. मराठ्यांना राज्यात शांतता हवी आहे. करोडोच्या संख्येने एकत्र आलाय. शांततेत शहरात गेला. शांततेत मैदानात आला. विनाकारण त्याला डाग लावू नका. मराठ्याला विनाकारण डिवचू नका.

    Jarange Patil on hunger strike in Mumbai from January 20; A warning from the meeting of Beed

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!