विशेष प्रतिनिधी
मुंबई : मनोज जरांगे पाटलांच्या उपोषणाच्या पार्श्वभूमीवर मराठा आंदोलन महाराष्ट्र तापत चालले असताना मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर तोडगा काढण्यासाठी मंत्रिमंडळाच्या उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी मंत्रालयात आयोजित करण्यात आली आहे. त्याचवेळी मनोज जरांगे पाटलांनी एक पाऊल मागे घेऊन सरकारशी चर्चेची तयारी दाखवली मराठा आरक्षणासंदर्भात एक सकारात्मक पाऊल यातून पुढे पडले. Jarange Patil are also preparing for talks with the government
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या शहरांमध्ये मराठा आंदोलन राज्याच्या मंत्र्यांना घेराव घालताना अडवताना आंदोलन तीव्र करण्याचा प्रयत्न करत आहेत. या पार्श्वभूमीवर मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक आणि जरांगे पाटलांची सरकारशी चर्चेची तयारी या दोन सकारात्मक बाबी समोर आल्या आहेत.
शिंदे – फडणवीस सरकारने मराठा आरक्षण आणि सुविधांसाठी गठीत केलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीची तातडीची बैठक सोमवारी बोलविली आहे. राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मंत्रालयातील दालनात ही बैठक आयोजित करण्यात आली आहे.
या बैठकीत मराठवाड्यातील मराठा समाजास मराठा – कुणबी, कुणबी – मराठा जातीचे जात प्रमाणपत्र देण्याच्या प्रकियेमध्ये आवश्यक त्या अनिवार्य पुराव्यांची वैधानिक आणि प्रशासकीय तपासणी करण्याबाबत तसेच तपासणीअंती मराठा समाजास मराठा- कुणबी, कुणबी – मराठा जात प्रमाणपत्र देण्याची कार्यपद्धती विहित करण्यासाठी न्यायमूर्ती संदीप शिंदे (निवृत्त) यांच्या अध्यक्षतेखाली गठित केलेली समिती आता पर्यत केलेल्या कामकाजाची माहिती मंत्रिमंडळ उपसमितीसमोर देणार आहे. यासाठी तातडीची बैठक आयोजित करण्यात आली आहे, असे चंद्रकांतदादा पाटील यांनी सांगितले.
जरांगे पाटलांची सरकारशी चर्चेची तयारी
मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा सरकारशी चर्चेची तयारी दर्शवली आहे. चर्चेसाठी येणार असाल तर मराठा समाज अडवणूक करणार नाही. कारण माझ्या जातीला आरक्षण द्यायचे आहे त्यामुळे एक पाऊल मागे जायला तयार आहे. जे पुरावे हवे आहेत द्यायला तयार आहे. मला समाजाला न्याय द्यायचा आहे. सरकारने चर्चेसाठी लवकर यावे. पण एकदाच तोडगा काढावा, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले.
राज्य सरकारने सोमवारी घेण्यात येत असलेली उपसमितीची बैठक रद्द करून एक दिवसाचं विशेष अधिवेशन बोलवावे आणि कायदा मंजूर करुन आरक्षण द्यावे. आरक्षण देण्यासाठी पुरेसे पुरावे आहेत, असे मनोज जरांगे पाटील म्हणाले.
Jarange Patil are also preparing for talks with the government
महत्वाच्या बातम्या
- परत येणारा तर व्हिडिओ टाकून येतो का??; देवेंद्र फडणवीसांचा माध्यमांनाच टोला!!
- US : लुईस्टनमध्ये २२ जणांची हत्या करणाऱ्या संशयिताचा सापडला मृतदेह, पोलिसांना आत्महत्येचा संशय
- ‘गीता प्रेस’चे विश्वस्त बैजनाथ अग्रवाल यांचे निधन; मुख्यमंत्री योगी यांनी व्यक्त केला शोक
- दिल्लीत नागरी संरक्षण स्वयंसेवकांना काढून टाकण्याचा प्रस्ताव मंजूर; सरकारने स्वतः एलजीकडे पाठवली होती फाइल, आता केजरीवाल सुप्रीम कोर्टात