विशेष प्रतिनिधी
जालना : राज्यात 54 लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत.त्या सर्वांना, त्यांच्या सगेसोयऱ्यांना कुणबीप्रमाणपत्र द्या. नोंदी सापडलेल्यांची नावे तातडीने जाहीर करुन विशेष बाबम्हणून सकाळी अर्जकेलेल्यांना संध्याकाळपर्यंत प्रमाणपत्र द्या , अशी मागणीमनोज जरांगे पाटील यांनी सरकारच्या शिष्टमंडळाकडे केली.Jarange Patal’s ultimatum to the state government; 54 lakh registered people, give certificate to their parents in 2 days
दरम्यान, सरकारच्या शिष्टमंडळाने दिलेल्या मसुद्यावर बुधवारीदुपारपर्यंत निर्णय कळवतो, असे सांगत मनोजजरांगे पाटील यांनी मुंबईतील आंदोलनावर ठाम असल्याचे सांगितले. सरकारतर्फे आमदार बच्चू कडू आणिमुख्यमंत्री वैद्यकीय मदत कक्षाचे मंगेश चिवटेयांनी मंगळवारी आंतरवालीत मनोज जरांगेपाटील यांची भेट घेतली.
सरकारला दिले मराठवाडा गॅझेट
1884च्या हैदराबाद गॅझेटमध्ये मराठवाड्यात 49 हजार कुणबी नोंदी असल्याचा उल्लेख आहे.शिवाय यात कुठेही मराठा नोंद नाही. त्यामुळे ज्याकुणबी नोंदी आहेत ते मराठेच असून कुणबी आणिमराठे एकच आहेत, असा आणखी एक पुरावाजरांगे पाटील यांनी बच्चू कडू यांच्याकडे सादरकेला. सातारा संस्थानचे गॅझेटीयरही दिले आहे.
मंत्र्यांची नावे आज जाहीर करणार
सरकारचे शिष्टमंडळ आंतरवालीत येण्यापूर्वी मंगळवारी जरांगे पाटील यांनी माध्यमाशी संवाद साधला. काही लोकांना हाताशी धरुन आमच्यावर ट्रॅप लावला जातोय. आमचा अपमान करायचेकाम काही मंत्री करत आहेत. त्यांची नावे बुधवारी संध्याकाळपर्यंत जाहीर करू, असे ते म्हणाले.
सग्यासोयऱ्यांना प्रमाणपत्र, तीन अधिसूचना जारी होणार : कडू
ज्यांचे पुरावे सापडलेत्यांना व त्यांच्या सगेसोयऱ्यांनाही कुणबी प्रमाणपत्र मिळावे, यासाठी नवीन तीन अधिसूचना जारी होणार आहेत. मुख्यमंत्र्यांनी यासाठी चार तास बैठक घेतली. देवी रोगाच्या साथीच्या नोंदी, भाटांकडील नोंद हे पुरावे ग्राह्य धरले जातील. या अधिसूचनांबाबत जरांगे पाटील यांच्याशी चर्चा करू, अशी माहिती बच्चू कडू यांनी मंगळवारी पत्रकार परिषदेत दिली.
मराठवाड्यात 2 कोटींवर अभिलेखांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 31 हजार 576 जणांच्या मराठा कुणबी, कुणबी मराठा म्हणून सापडल्या आहेत. यापैकी 14 हजार 148 जणांना ओबीसी प्रमाणपत्रे दिली, असेही त्यांनी सांगितले.
Jarange Patal’s ultimatum to the state government; 54 lakh registered people, give certificate to their parents in 2 days
महत्वाच्या बातम्या
- देवेंद्र फडणवीसांच्या प्रयत्नांतून सुरजागड इस्पात गडचिरोलीत करणार 10,000 कोटींची गुंतवणूक!!
- WATCH : काश्मीरची मुस्लिम विद्यार्थिनी बतुल जहरा गाते राम भजन, सांगितले हे खास कारण
- राम भजन म्हणायचे आवाहन केल्यामुळे मल्याळम गायिका चित्रा सोशल मीडिया ट्रोल; पण रामभक्तांचा मिळाला जबरदस्त पाठिंबा!!
- उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषदेचा केला मोठा इव्हेंट; पण सुनावणीत कायद्याचा किस पाडण्यात का गेले फेल??