विशेष प्रतिनिधी
मुंबई : उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शिव्या देतच मनोज जरांगे यांना आज सकाळीच बॅकफूटवर जावे लागले. अंतरवाली सराटीतून मुंबईकडे येताना त्यांना भांबेरी गावात थांबावे लागले होते. पण प्रशासनाने तिथे संचारबंदी लागू करताच त्यांना सकाळीच अंतरवली सराटीत परतावे लागले. पण त्याचवेळी मनोज जरांगे यांनी फडणवीसांना अरे तुरेची भाषा करत शिवीगाळच केली. Jarange is on the backfoot by cursing Fadnavis
पण त्याच वेळी जरांगेंच्या समर्थकांनी जालना जिल्ह्यातील घनसावंगी तालुक्यातील तीर्थपुरी मध्ये एसटीची बस जाळली. अंबडहून रामसागावकडे चाललेली बस आंदोलकांनी थांबवली आणि तिला आग लावून दिली. मनोज जरांगे यांच्या आंदोलकांचा उपद्रव वाढल्याने प्रशासनाने छत्रपती संभाजी नगर, जालना आणि बीड जिल्ह्यामध्ये इंटरनेट सेवा काही काळ स्थगित केली आहे.
मनोज जरांगे पाटील यांनी रविवारी भाजप नेते आणि राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप करताना शिवराळ भाषा वापरली होती. त्यानंतर मराठा समाजातील लोकांनी व्यासपीठावर येऊन त्यांची समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता. परंतु संतापलेले मनोज जरांगे पाटील ऐकण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आणि ते निघाले. त्यानंतर रात्री भांबेरी येथे मुक्काम केला. सकाळी पुन्हा ते मुंबईकडे निघणार होते. परंतु अचानक त्यांनी हा निर्णय रद्द केला. ते पुन्हा अंतरवाली सराटीत दाखल झाले. उपोषणस्थळी पोहचल्यावर डॉक्टरांनी त्यांची वैद्यकीय तपासणी केली.
जरांगे म्हणाले, तुम्ही येऊ नका…
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत येण्याचा निर्णय घेतला होता. मी एकटा जातो तुम्ही कोणी येऊ नका, असे आवाहन त्यांनी केले होते. त्यानंतर त्यांच्या समर्थनार्थ भांबेरी गावामध्ये मराठा आंदोलक दाखल होऊ लागले होते. राज्याच्या विविध जिल्ह्यातून मराठा आंदोलक भांबेरी गावामध्ये येत होते. मनोज जरांगे यांनी आम्हाला येऊ नका असे आवाहन केले असले तरी आम्ही त्यांना एकटे सोडणार नाही, असे आंदोलक म्हणत होते. सोमवारी सकाळी 9.00 वाजेच्या सुमारास मनोज जरांगे पुन्हा माध्यमाशी बोलायला लागले. यावेळी त्यांनी मुंबईला जाण्याचा निर्णय स्थगित केला. आपण अंतरवाली सराटीत जात असून त्या ठिकाणी निर्णय घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
मनोज जरांगे अंतरवलीमध्ये दाखल
मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईत जाण्याचा निर्णय स्थगित केला. त्यानंतर मनोज जरांगे अंतरवलीमध्ये दाखल झाले. त्यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. मराठा समाजातील कार्यकर्त्यांना तत्काळ आपल्या गावाला जाण्याचे आवाहन केले. यावेळी डॉक्टरांनी त्यांच्या प्रकृतीची तपासणी केली.
अंबड तालुक्यात संचारबंदी
बीड- सोलापूर- जालना या महामार्गावर तसेच अंबड तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणात मराठा समाज जमा होण्याची शक्यता आहे. यामुळे जालनाचे जिल्हाधिकारी श्रीकृष्ण पांचाळ यांनी सोमवार दिनांक 26 फेब्रुवारी मध्यरात्री एक वाजल्यापासून अंबड तालुक्यामध्ये संचारबंदी लागू केली आहे.
जरांगे यांच्या सहकाऱ्यांना घेतले ताब्यात
जरांगे यांचा सगळ्यात जवळचा सहकारी आणि विश्वासू श्रीराम कुरणकर यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गेल्या अनेक वर्षांपासून कुरणकर हा जरांगे सोबत काम करत होता.
Jarange is on the backfoot by cursing Fadnavis
महत्वाच्या बातम्या
- नाट्यसंस्कृतीला अधिक बळकट करण्यासाठी राज्यात ७५ नाट्यगृहे अद्ययावत करण्यात येणार – मुख्यमंत्री शिंदे
- हल्दवानी हिंसाचाराचा मास्टरमाइंड अब्दुल मलिकला दिल्लीतून अटक
- 40 वर्षांनंतर पवारांना आत्ता रायगड आठवला!!; फडणवीस + राज ठाकरेंचा निशाणा
- अखिलेश यादव राहुल गांधींच्या भारत जोडो न्याय यात्रेत सामील होणार, पण तिला PDA यात्रा म्हणणार!!