Thursday, 8 May 2025
  • Download App
    जपानी उद्योगपतींना चीन मधली गुंतवणूक सुरक्षित वाटत नाही, त्यांना ती गुंतवणूक भारतात आणायचीय; फडणवीसांचा निर्वाळा|Japanese industrialists do not feel safe investing in China, they want to bring that investment to India; Nirwala of Fadnavis

    जपानी उद्योगपतींना चीन मधली गुंतवणूक सुरक्षित वाटत नाही, त्यांना ती गुंतवणूक भारतात आणायचीय; फडणवीसांचा निर्वाळा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : जपानी उद्योगपतींना त्यांची चीनमध्ये असलेली गुंतवणूक बिलकुल सुरक्षित वाटत नाही. त्यांना ती गुंतवणूक तिथून काढून घेऊन भारतातल्या सुरक्षित वातावरणात आणायची आहे, असा स्पष्ट निर्वाळा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत विमानतळावर पत्रकारांशी बोलताना दिला.Japanese industrialists do not feel safe investing in China, they want to bring that investment to India; Nirwala of Fadnavis

    जपानचे शाही पाहुणे म्हणून तिथे पाच दिवसांच्या दौऱ्यावरून फडणवीस मुंबईत परतले. भाजपच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनी त्यांचे विमानतळावर जंगी स्वागत केले. यावेळी राज्याचे मंत्री दीपक केसरकर, आमदार आशिष शेलार, माजी मंत्री कृपाशंकर सिंह हे प्रामुख्याने उपस्थित होते.



    जपानी उद्योगपतींशी झालेल्या चर्चेची तपशीलवार माहिती त्यांनी पत्रकारांना दिली. फडणवीस म्हणाले, की जपान मधल्या अनेक उद्योगपतींशी शिष्टमंडळ स्तरावर आमची चर्चा झाली. सप्लाय चेनचा भाग म्हणून जपानी उद्योगपतींनी चीनमध्ये गुंतवणूक केली. पण त्या उद्योगपतींना चीनमध्ये केलेली गुंतवणूक सुरक्षित वाटेनाशी झाली आहे. त्यांना तेथून ती गुंतवणूक काढून घेऊन भारतासारख्या सुरक्षित आणि उत्साहवर्धक वातावरण असलेल्या देशात आणायची आहे. तिथे अनेक उद्योगपतींनी भारताविषयी खूप मोठी उत्सुकता दाखवली हे उद्योगपती अन्य देशांमध्ये ही गुंतवणुकीसाठी गेले होते. परंतु त्यांना भारताइतके सुरक्षित आणि उत्साही वातावरण आढळले नाही, हे त्यांनीच आम्हाला सांगितले अशी माहिती देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

    मेट्रो पासून आर्टिफिशियल इंटेलिजन्स पर्यंत अनेक क्षेत्रांमध्ये जपानी उद्योगपती भारतात गुंतवणूक करू इच्छितात. त्यासाठी महाराष्ट्रात क्षेत्र आणि जपानी भाषा बोलणाऱ्यांच्या टीम तयार करून जपानी उद्योगपतींशी संपर्क साखळी प्रस्थापित करता येईल. त्यातली एक टीम महाराष्ट्रात काम करेल तर दुसरी टीम जपान मध्ये जाऊन काम करेल, अशी माहिती फडणवीस यांनी दिली.

    फडणवीस यांनी यावेळी राजकीय प्रश्नांना फारशी उत्तरे दिली नाहीत. काँग्रेसने आता देशाचा विचार करणे सोडून दिले आहे. त्यामुळे त्यांचे नेते निराशेतून काहीही बोलत राहतात, असा टोला त्यांनी काँग्रेस नेते आणि नाना पटवले यांना हाणला. मात्र, शरद पवारांसंदर्भात विचारलेल्या राजकीय प्रश्नांना कोणतेही प्रत्युत्तर न देता फडणवीस विमानतळावरून निघून गेले.

    Japanese industrialists do not feel safe investing in China, they want to bring that investment to India; Nirwala of Fadnavis

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Developed Maharashtra 2047 : प्रशासनातील सुधारणा म्हणजेच ‘विकसित महाराष्ट्र 2047’ चा आराखडा

    Devendra Fadnavis : मुंबईतील प्रवास आता अधिक सुलभ अन् स्मार्ट – देवेंद्र फडणवीस

    सिंदूर समर्पणाने श्रद्धांजली : वीर हुतात्म्यांच्या स्मरणार्थ रामतीर्थ गोदावरी सेवा समितीचे ललिता सहस्रनाम पूजन आणि सिंदूर वितरण

    Icon News Hub