• Download App
    जनआशिर्वाद यात्रेचे बॅनर फाडले, आमदार राजन साळवींसह १६ जणांवर गुन्हा दाखल Jana Ashirwad Yatra banner torn, MLA Rajan Salvi and 16 others charged

    जनआशिर्वाद यात्रेचे बॅनर फाडले, आमदार राजन साळवींसह १६ जणांवर गुन्हा दाखल

    विशेष प्रतिनिधी

    रत्नागिरी : केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या जनआशिर्वाद यात्रेतील बॅनर फाडल्याप्रकरणी आमदार राजन साळवी यांच्यासह १६ जणांवर गुन्हा दाखल केला आहे. रत्नागिरी येथे हा प्रकार घडला होता. Jana Ashirwad Yatra banner torn, MLA Rajan Salvi and 16 others charged

    राणे यांना अटक होण्याआधी शिवसेनेने जिल्हाभरात अनेक ठिकाणी आंदोलन केले. रत्नागिरीत आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्त्वाखाली जनआशीर्वाद यात्रेचे बॅनर्स फाडण्यात आले. त्यामुळे जिल्हाधिकारी यांच्या मनाई आदेशाचे उल्लंघन केल्याच्या आरोपावरून आमदार राजन साळवी यांच्यासह सोळाजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

    मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना अटक करण्यात यावी, या मागणीसाठी शिवसेनेने जिल्हाभर आंदोलन सुरू केले. चिपळूण, खेड, गुहागर, लांजा, राजापूर, संगमेश्वर, आरवली अशा अनेक ठिकाणी शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी केली. रत्नागिरीतही आमदार राजन साळवी यांच्या नेतृत्वाखाली शिवसैनिकांनी घोषणाबाजी करत मारुती मंदिर येथे लावण्यात आलेले जनआशीर्वाद यात्रेचे बॅनर्स फाडले.

    जिल्हाधिकारी यांच्या आदेशाचे उल्लंघन केले म्हणून आमदार साळवी यांच्यासह संजय साळवी, परेश खातू, प्रसाद सावंत, प्रकाश सावंत, प्रशांत साळुंखे यांच्यासह अन्य १० जणांविरोधात शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

    Jana Ashirwad Yatra banner torn, MLA Rajan Salvi and 16 others charged

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    भाजपच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती; पुण्यात धीरज घाटे कायम, पिंपरी चिंचवडची धुरा शत्रुघ्न काटे यांच्याकडे

    Devendra Fadnavis : सहकाराच्या सक्षमीकरणासाठी कायद्यात बदल आवश्यक – देवेंद्र फडणवीस

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक