• Download App
    महाराष्ट्राची जलयुक्त शिवार योजना देशात अव्वल; देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीवर केंद्राची अधिमान्यतेची मोहोर!! Jalyuakt shivar yojana stood first in water conservation in India

    महाराष्ट्राची जलयुक्त शिवार योजना देशात अव्वल; देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीवर केंद्राची अधिमान्यतेची मोहोर!!

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने जाहीर केलेल्या भारतातल्या जलाशयांच्या जनगणनेत महाराष्ट्रात मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राबविलेली जलयुक्त शिवार योजना देशात अव्वल ठरली आहे. देशभरातल्या सिंचनामध्ये देवेंद्र फडणवीस यांनी अभ्यासपूर्वक दूरदृष्टीने राबविलेल्या या योजनेस संपूर्ण देशाची आता अधिमान्यता मिळाली आहे. Jalyuakt shivar yojana stood first in water conservation in India

    जल संवर्धन योजनांच्या बाबतीत महाराष्ट्राने देशात प्रथम क्रमांक पटकावला असून केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने भारतातील जलाशयांच्या पहिल्या गणनेचा अहवाल जाहीर केला आहे. या अहवालातूनच जलयुक्त शिवार योजनेचे यश अधोरेखित झाले आहे.

    देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना जलयुक्त शिवार योजना सुरू केली होती मात्र 2019 मध्ये देवेंद्र फडणवीस यांना बाजूला सारून उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीशी हात मिळवणी करून महाविकास आघाडीचे सरकार तयार केल्यानंतर या जलयुक्त शिवार योजनेस त्या सरकारने नख लावले ती योजना स्थगित केली होती. मात्र आता ठाकरे पवार सरकार जाऊन शिंदे फडणवीस सरकार आल्यानंतर पुन्हा एकदा फडणवीसांच्या दूरदृष्टीतली जलयुक्त शिवार योजना सरकारने पुन्हा राबवायला सुरुवात केली असून याच जलयुक्त शिवार योजनेस देशात अव्वल क्रमांक मिळाला आहे. जलयुक्त शिवारामुळे महाराष्ट्राला जलसंवर्धनात प्रथम क्रमांकावर आला.



    जलयुक्त शिवार अभियान

    •  या योजनेमुळे दुष्काळग्रस्त 18 हजार गावांचा पाण्याचा प्रश्न सुटला.
    •  मराठवाड्यात भूजल पातळी सरासरी ३ मीटर ने वाढली भूजल तज्ञांचा रिपोर्ट.
    •  शेतकरी दुहेरी पिके घेऊ लागला.
    •  शेतकऱ्यांच उत्त्पन्न वाढले.
    •  जनावरांना १२ महिने चारा मिळू लागला.
    •  आकस मनात धरून, भ्रष्ट्राचार झाला असा आरोप करून महत्वाकांक्षी योजना बंद केली.
    •  चौकशी समितीचा अहवाल जलयुक्त शिवार योजनेत कोणताही भ्रष्टाचार झाला नाही. योजना योग्य पद्धतीने राबवली गेली.
    •  जलयुक्त शिवार विरोधक म्हणू लागले जलयुक्त शिवारामुळे महाराष्ट्रात पूर परिस्थिती ओढवली, यातच या योजनेचे यश दिसून येतं होतं
    •  आता तर केंद्रीय जलशक्ती मंत्रालयाने या जलयुक्त शिवाय योजनेवर केंद्र सरकारच्या अधिमान्यतेची मोहोर उमटवली आहे.

    Jalyuakt shivar yojana stood first in water conservation in India

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!