• Download App
    जालना - नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना चारपट मोबदला देऊ, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण । Jalna Nanded Samrudhi Highway land acquisition will pay farmers four times, Says Ashok Chavan

    जालना – नांदेड समृद्धी महामार्गाच्या भूसंपादनात शेतकऱ्यांना चारपट मोबदला देऊ, सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाणांचे स्पष्टीकरण

    Jalna Nanded Samrudhi Highway : जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जालना नांदेड समृद्धी महामार्गाशी संबंधित भूसंपादन प्रक्रियेवरही भाष्य केले. Jalna Nanded Samrudhi Highway land acquisition will pay farmers four times, Says Ashok Chavan


    प्रतिनिधी

    नांदेड : जिल्ह्याचे पालकमंत्री अशोक चव्हाण यांनी नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेला भेट दिली. यावेळी घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी जालना नांदेड समृद्धी महामार्गाशी संबंधित भूसंपादन प्रक्रियेवरही भाष्य केले.

    अशोक चव्हाण म्हणाले की, समृद्धी महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याच्या भूसंपादनाची प्रक्रिया चालू झाली असून यामध्ये शासनाच्या गाईडलाईन्सप्रमाणे चारपट मोबदला देण्यात येईल. परंतु यामध्ये काही राजकारणी चुकीची माहिती लोकांपर्यंत पोहोचवत आहेत, तसं असून आम्ही शासनाने दिलेल्या नियमानुसारच शेतकऱ्यांना मोबदला देणार आहोत, असेही त्यांनी स्पष्ट केले.

    दरम्यान, अनेक राज्यांनी पेट्रोल आणि डिझेलचे भाव कमी केले, मात्र महाराष्ट्रात अद्याप भाव कमी झाले नाहीत या प्रश्नाचे उत्तर देताना अशोक चव्हाण म्हणाले की, केंद्रशासन दर महिन्याला जवळपास साडेतीनशे कोटी रुपये राज्य शासनाला देते पण ते वेळेवर न दिल्यामुळे व जीएसटीची रक्कम राज्याला न दिल्यामुळे राज्याच्या तिजोरीवर भार येत असून केंद्र शासनानेच वरच्या लेव्हलला पेट्रोलचे दर कमी करून राज्याला देण्यात यावेत.

    Jalna Nanded Samrudhi Highway land acquisition will pay farmers four times, Says Ashok Chavan

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Modi Putin : मोदींची पुतिन यांच्याशी फोनवर चर्चा; म्हणाले- भारतात तुमचे स्वागत करण्यास उत्सुक

    Indian Army : भारतीय लष्कर आणि हवाई दलाला 200 नवीन हलके हेलिकॉप्टर मिळणार; जुने चेतक-चित्ता हेलिकॉप्टर निवृत्त केले जातील

    Government : सरकार तेल कंपन्यांना ₹30 हजार कोटी देणार; यामुळे उज्ज्वला सिलेंडरवर ₹300ची सबसिडी मिळत राहणार