विशेष प्रतिनिधी
जालना : जाफराबादेत वाळू माफियांची गुंडगिरी फोफावली आहे. शुक्रवारी (11 जून) थेट पत्रकारावर जीवघेणा हल्ला वाळू माफियांनी केला. हातात लाठ्या-काठ्या घेऊन सात ते आठ जणांनी पत्रकाराला जीवघेणी मारहाण केली. विशेष म्हणजे जाफराबादेत भर रस्त्यात पंचायत समिती समोर वाळू माफियांनी पत्रकाराला मारहाण केली. यावेळी बघ्यांची मोठी गर्दी उसळली होती. या हल्ल्याचा व्हिडीओ देखील आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओतील मारहाणीवर अनेकांनी निषेध व्यक्त केला आहे. JALNA JOURNALIST ATTACK ! Sand Mafia attack on reporter in Jalna
नेमकं प्रकरण?
जाफराबाद जवळून पूर्णा नदी वाहते. या नदीतून अवैध वाहतूक होत असल्याच्या बातम्या दैनिक ‘पुढारी’चे तालुका प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाबळे यांनी छापून आणल्या होत्या. याचा राग वाळू माफियांना होता. यातूनच वाळू माफियांनी हा हल्ला घडवून आणला. या हल्ल्यात पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे गंभीर जखमी झाले. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून त्यांच्यावर जालन्यातील शासकीय रुग्णालयात उपचार सुरु आहेत. त्यांच्यावरील हल्ल्याच्या घटनेमुळे जाफराबाद तालुका हादरला आहे. तसेच सर्वसामान्य नागरिक आणि पत्रकार संघटनांनी या हल्ल्याचा निषेध केला आहे.
ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावरील हल्ल्याचा पडसाद संपूर्ण तालुक्यात पडला आहे. या हल्लेप्रती अनेकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान, ज्ञानेश्वर पाबळे यांना न्याय मिळावा यासाठी जाफराबाद तालुका मराठी पत्रकार संघाने पोलिसात धाव घेतली आहे. पत्रकार ज्ञानेश्वर पाबळे यांच्यावर हल्ला करणाऱ्यांवर कठोरातील कठोर कारवाई व्हावी, अशी विनंती पत्रकार संघाने निवेदन देऊन केली आहे.
JALNA JOURNALIST ATTACK ! Sand Mafia attack on reporter in Jalna
महत्त्वाच्या बातम्या
- भाजपकडून शिवसेनेचा पाच वर्षे निव्वळ छळ – संजय राऊत
- नववीनंतर तीन लाख मुलांची गळती, कोरोनाचे शिक्षणावर गंभीर परिणाम
- उत्तर प्रदेशात ग्रामस्थांनी उभारले चक्क कोरोना मातेचे मंदिर, भविकांची दर्शनासाठी रीघ
- संयुक्त किसान मोर्चा करणार देशभरातील राजभवनावर निदर्शने
- Maharashtra Corona Updates : राज्यामध्ये शनिवारी आढळले १०,९६२ नवीन रुग्ण, १४,९१० जणांना डिस्चार्ज; १,५५,४७४ ॲक्टिव्ह रुग्ण