भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार १९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता बळीराम पेठ येथील भाजपा कार्यालयापासून ते टॉवर चौकात मोर्चा काढला.Jalgaon: Crime filed against MLA Rajumama Bhole and ten other office bearers
विशेष प्रतिनिधी
जळगाव : काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केले होते.दरम्यान या वक्तव्याचा निषेध करण्यासाठी भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी बुधवार १९ जानेवारी रोजी सायंकाळी ४ वाजता मोर्चा काढला.
हा मोर्चा बळीराम पेठ येथील भाजपा कार्यालयापासून ते टॉवर चौकात काढण्यात आला.त्यानंतर टॉवर चौकात काँग्रेसचे नेते नाना पटोले यांच्या प्रतिकात्मक बॅनर जाळून आंदोलन केले होते.
दरम्यान जळगाव शहरातील टॉवर चौक येथे भाजपाने जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन करून आंदोलन केल्याप्रकरणी आमदार राजूमामा भोळे यांच्यासह भाजपाच्या दहा पदाधिकाऱ्यांविरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोहेकॉ रविंद्र सोनार करीत आहे.
याप्रकरणी शहर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक नरेंद्र ठाकरे यांच्या फिर्यादीवरून रात्री ९ वाजता शहर पोलीस ठाण्यात आमदार राजूमामा भोळे, महानगराध्यक्ष दीपक प्रभाकर सुर्यवंशी, सचिन पवार, राजेश भावसार, लालंद पाटील, तुकाराम निकम, माजी आमदार स्मिता वाघ यांच्यासह दहा कार्यकर्त्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Jalgaon: Crime filed against MLA Rajumama Bhole and ten other office bearers
महत्त्वाच्या बातम्या
- ओडिशाच्या किनारपट्टीवरून ब्रह्मोस सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्राच्या नवीन आवृत्तीची यशस्वी चाचणी, ३५० ते ४०० किमीपर्यंत मारक क्षमता
- OBC Reservation : NEET-PG मध्ये OBC आरक्षणाबाबत सुप्रीम कोर्टाचा आज मोठा निर्णय, वाचा सविस्तर…
- Hate Speech : महात्मा गांधींबद्दल अपमानास्पद वक्तव्याचे प्रकरण, आता ठाणे पोलिसांनी केली कालीचरण महाराजांना अटक
- Coronavirus : आता एक्स-रेने कळणार कोरोना आहे की नाही, ५ ते १० मिनिटांत होणार निदान