विशेष प्रतिनिधी
मुंबई : Jaideep Apte arrested मालवणच्या राजकोट किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पूर्णाकृती पुतळा कोसळला. हा पुतळा उभारल्यानंतर अवघ्या आठ महिन्यात कोसळला. त्यामुळे सर्वसामान्य जनता, शिवप्रेमींमध्ये प्रचंड नाराजी आहे. या घटनेवरुन विरोधकांनी राजकारण चालविले असताना पोलिसांनी पुतळ्याचा शिल्पकार जयदीप आपटेला अटक केली. जयदीपच्या पत्नीने पोलिसांना दिलेल्या माहितीच्या आधारे जयदीपला अटक केली. पोलीस आता जयदीपला प्रत्यक्ष घटनास्थळी नेऊन पुढच्या तपासाच्या दृष्टीने त्याचा जबाब नोंदवणार आहेत. Jaideep Apte arrested
या प्रकरणात जयदीप आपटे आणि चेतन पाटील दोघे मुख्य आरोपी आहेत. त्यांच्याविरोधात मालवण पोलीस ठाण्यात एफआयआरची नोंद आहे. जयदीप आपटे शिवरायांच्या पुतळ्याचा शिल्पकार होता. चेतन पाटीलकडे चबुतऱ्याची जबाबदारी होती. चेतन पाटीलला काही दिवसांपूर्वी अटक झाली. पण जयदीप आपटे सापडत नव्हता. जितेंद्र आव्हाड यांनी डॉन चित्रपटातील डायलॉग मारुन जयदीप आपटेको पकडना नामुमकिन हैं असं म्हटलं होतं. मागच्या अनेक दिवसांपासून फरार असलेला हाच जयदीप आपटे पोलिसांच्या हाती लागला आहे.
जयदीप आपटे अंधाराचा फायदा घेत पत्नी आणि आईला भेटण्यासाठी त्याच्या कल्याणच्या राहत्या घरी आला होता. त्याचवेळी पोलिसांनी जयदीप आपटे याला ताब्यात घेतल्याच्या बातम्या मराठी माध्यमांनी दिली असल्या तरी प्रत्यक्षात जयदीपच्या पत्नीने आणि अन्य कुटुंबीयांनी त्याला पोलिसांसमोर शरणागती पत्करायला समजावून सांगितले अशी बातमी टाइम्स ऑफ इंडियाने दिली आहे.
जयदीप आपटे याच्या विरोधात सिंधुदुर्ग पोलिसांनी लुकआऊट जारी केली होती. 39 वर्षाचा जयदीप आपटे जेजे स्कूल ऑफ आर्टचा माजी विद्यार्थी आहे. पोलिसांसमोर त्याने शरणागती पत्करावी यासाठी कुटुंब आणि मित्र परिवाराकडून त्याचं मन वळवण्याचा प्रयत्न सुरु होता. तो काल संध्याकाळी घरी येताच पोलिसांनी त्याला अटक केली
कुटुंबाची भूमिका काय होती?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जयदीप आपटेने पत्नीशी संपर्क साधला. मी घरी येतोय असं तिला सांगितलं. तिने पोलिसांना याबद्दल कळवलं. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे. जयदीपच्या कुटुंबियांना त्याची चिंता होती. त्याने घरी येऊन पोलिसांना चौकशीत सहकार्य करावं, अशी त्यांची भूमिका होती.
Jaideep Apte arrested
महत्वाच्या बातम्या
- Suhas Yathiraj : पॅरालिम्पिक 2024: भारताला 12वे पदक, सुहास यथीराजने बॅडमिंटनमध्ये रौप्यपदक जिंकले
- PM Modi : …म्हणून पंतप्रधान मोदींनी पुन्हा घेतले भाजपचे सदस्यत्व!
- 2 महिन्यांवर निवडणूक आली तरी, महाराष्ट्रात काँग्रेस मुख्यमंत्री ठरवेना; पण 5 वर्षांनंतरच्या निवडणुकीत राहुल गांधींच्या पंतप्रधान पदाचा 100 % वायदा!!
- Vaishno Devi Yatra : वैष्णोदेवी यात्रेच्या मार्गावर मोठी दरड कोसळली, अनेक लोक अडकले