• Download App
    No Pressure on Me: Jai Pawar on Postponing Press Meet Over Ajit Pawar Crash VIDEOS जय पवार यांनी सांगितले पत्रकार परिषद पुढे ढकलल्याचे सांगितले कारण, म्हणाले- पुढील आठवड्यात सर्व स्पष्ट करणार

    Jai Pawar : जय पवार यांनी सांगितले पत्रकार परिषद पुढे ढकलल्याचे सांगितले कारण, म्हणाले- पुढील आठवड्यात सर्व स्पष्ट करणार

    Jai Pawar

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Jai Pawar  माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर निर्माण झालेला संशयाचा धूर अद्याप शमलेला नाही. या प्रकरणातील ‘डीजीसीए’चा प्राथमिक अहवाल नाकारणारे जय पवार यांच्यावर ही सत्य परिस्थिती दडपण्यासाठी कुणाचा दबाव आहे का? अशा चर्चांना उधाण आले होते. या पार्श्वभूमीवर, “माझ्यावर कुणाचाही दबाव नाही, पूर्ण माहितीनिशी पुढच्या आठवड्यात मी पत्रकार परिषद घेऊन सर्व काही स्पष्ट करणार आहे,” असा मोठा खुलासा जय पवार यांनी आज केला.Jai Pawar

    अजित पवार ज्या दुर्दैवी विमानातून प्रवास करत होते, त्याच विमानात फ्लाईट अटेंडंट असलेल्या पिंकी माळी यांचेही निधन झाले होते. जय पवार यांनी आज माळी यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. “पिंकी माळी यांच्या आईचे दुःख शब्दांच्या पलीकडचे आहे. हे दुःख सहजासहजी जाणारे नाही, मात्र आम्ही आता एक कुटुंब म्हणून एकमेकांची काळजी घेणार आहोत,” असे भावूक उद्गार जय पवार यांनी यावेळी काढले.Jai Pawar



    पत्रकार परिषद का लांबणीवर पडली?

    जय पवार यांनी आपली पूर्वनियोजित पत्रकार परिषद अचानक पुढे ढकलल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चा सुरू झाली होती. आमदार रोहित पवार यांनीही जय पवारांवर कुणाचा तरी दबाव असल्याचा संशय व्यक्त केला होता. यावर स्पष्टीकरण देताना जय पवार म्हणाले, “माझ्यावर कुणाचाही दबाव नाही. केवळ अर्धवट माहितीच्या आधारे समोर येण्यात अर्थ नाही. मला या प्रकरणाची अधिक सखोल आणि अतिरिक्त माहिती गोळा करायची आहे. सत्य माहिती हाती आल्याशिवाय बोलणे योग्य ठरणार नाही, म्हणूनच पत्रकार परिषद पुढे ढकलण्याचा निर्णय आम्ही घेतला.”

    पुढच्या आठवड्यात सविस्तर भूमिका मांडणार

    “मी पुढच्या आठवड्यात पत्रकार परिषद घेणार असून, माझ्या मनात असलेल्या सर्व शंका आणि वस्तुस्थिती महाराष्ट्रासमोर मांडणार आहे,” असे जय पवार यांनी यावेळी सांगितले. अजितदादांच्या मृत्यूबाबत आणि विमान अपघाताच्या चौकशी अहवालावर त्यांनी आधीच असमाधान व्यक्त केल्याने, आगामी पत्रकार परिषदेत ते कोणता नवीन गौप्यस्फोट करतात, याकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे.

    No Pressure on Me: Jai Pawar on Postponing Press Meet Over Ajit Pawar Crash VIDEOS

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    इस्लामला इतरांचे सहअस्तित्वच अमान्य; सहिष्णू समाजापुढे मुस्लिम प्रश्नाचे मोठे आव्हान!!

    Chhagan Bhujbal : परिस्थिती गंभीर, पर्याय म्हणून केरोसिन वापरा; नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांचा अजब सल्ला

    Rohit Pawar : पुण्यातील महामार्गाला अजितदादांचे नाव द्यावे; रोहित पवारांची नितीन गडकरींकडे मागणी