बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला रविवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले. ती सलमान खानच्या ‘द-बँग’ टूरसाठी रियाधला जात होती. जॅकलिन फर्नांडिसची २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू आहे. फसवणूक प्रकरणात अडकलेल्या सुकेश चंद्रशेखरशी संबंधित हे आहे. Jacqueline Fernandez barred from going abroad, prosecuted in money laundering case, witnesses in Rs 200 crore ransom case
वृत्तसंस्था
मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री जॅकलिन फर्नांडिसला रविवारी संध्याकाळी मुंबई विमानतळावर परदेशात जाण्यापासून रोखण्यात आले. ती सलमान खानच्या ‘द-बँग’ टूरसाठी रियाधला जात होती. जॅकलिन फर्नांडिसची २०० कोटींच्या मनी लाँड्रिंग प्रकरणात चौकशी सुरू आहे. फसवणूक प्रकरणात अडकलेल्या सुकेश चंद्रशेखरशी संबंधित हे आहे. या प्रकरणाची चौकशी करणार्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) जॅकलिनविरुद्ध लुकआउट परिपत्रक जारी केले आहे. याप्रकरणी ईडीने अभिनेत्री नोरा फतेहीचीही चौकशी केली आहे.
जॅकलिनला मिळाले महागडी गिफ्ट्स
ईडीच्या म्हणण्यानुसार, सुकेश चंद्रशेखरकडून 200 कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात जॅकलीन महत्त्वाची साक्षीदार आहे. सुकेश सध्या दिल्लीच्या तिहार तुरुंगात कैदेत आहे. जॅकलीन सुकेशला डेट करत होती, असा आरोप आहे. यादरम्यान सुकेशने जॅकलिनला अनेक महागडे गिफ्ट्स दिले आहेत. त्यामध्ये 9 लाख रुपयांची मांजरही आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, सुकेश चंद्रशेखरने चौकशीदरम्यान सांगितले होते की, त्याने जॅकलिनला 52 लाख रुपये किमतीचा एक घोडा आणि चार पर्शियन मांजरी भेट दिल्या होत्या. यापैकी एका मांजराची किंमत 9 लाख रुपये आहे. जॅकलिन आणि सुकेश यांच्यातील जवळीक सिद्ध करणाऱ्या फोटोंसह अनेक पुरावे ईडीला मिळाले आहेत. ऑगस्टमध्ये जॅकलिनची ईडीने चौकशीही केली होती. याप्रकरणी सुकेश चंद्रशेखर, त्याची पत्नी लीना मारिया पॉल आणि इतर ६ जणांविरुद्ध ७ हजार पानांचे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.
सुकेश आणि इतरांविरुद्ध दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेत एफआयआर दाखल करण्यात आला आहे. सुकेश चंद्रशेखर हा या फसवणुकीचा सूत्रधार असल्याचे ईडीने छापेमारीनंतर सांगितले होते. वयाच्या १७व्या वर्षापासून तो गुन्हेगारी जगताचा भाग आहे. ईडीने 24 ऑगस्ट रोजी सुकेशचा चेन्नईतील सी-फेसिंग बंगला जप्त केला होता. बंगल्यातून 82.5 लाख रुपये, 2 किलो सोने आणि 12 पेक्षा जास्त आलिशान कार जप्त करण्यात आल्या आहेत.
Jacqueline Fernandez barred from going abroad, prosecuted in money laundering case, witnesses in Rs 200 crore ransom case
महत्त्वाच्या बातम्या
- ….तर रिपब्लिकन पक्ष राज्य सरकार विरोधात उतरून आंदोलन करेल ; रामदास आठवले यांनी राज्य सरकारला दिला इशारा
- शिवसेना उत्तर प्रदेशात काँग्रेसला “बूस्टर डोस” देणार; मराठी माध्यमांच्या बातम्यांमधून दावे!!
- DR.BABASAHEB AMBEDKAR : महामानवाच्या अस्थी मराठवाड्यात !औरंगाबादच्या भाऊसाहेब मोरे कुटुंबियांकडे ‘भीम’ वारसा …
- बीडचा सुपुत्र अविनाश आंधळेला वीरमरण ; आज दुपारी पार्थिवर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार