वृत्तसंस्था
मुंबई : मुंबईतून गोव्याकडे निघालेल्या क्रूजवर झालेल्या ड्रग्स रेव्ह पार्टीत बॉलीवुडची मोठी कनेक्शन्स उघडकीस आली आहेत, असा धक्कादायक खुलासा नारकोटिक्स ब्यूरोचे प्रमुख आर. एन. प्रधान यांनी एएनाआय वृत्तसंस्थेशी बोलताना केला आहे. It’s a result of a painstaking investigation that went on for two weeks. We acted on specific intelligence inputs, involvement of some Bollywood links has come to light: NCB chief SN Pradhan
बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याच्यासह आठ जणांना नार्कोटिक्स ब्युरोने चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. या पार्श्वभूमीवर प्रधानांनी बॉलीवुडच्या कनेक्शनचा खुलासा केला आहे. बॉलीवूड मधला सुपरस्टार शाहरुख खान यांचा मुलगा ड्रग्सच्या रेव्ह पार्टीत सापडतो. त्याच्याबरोबर बॉलिवुडमधल्या अनेकांची मुले सापडतात. यातून आणखी मोठी कनेक्शन पुढे येतील, असे ते म्हणाले.
गेल्या दोन आठवड्यांपासून नेमक्या गुप्तचर खात्याच्या अहवालावर आम्ही काम करत होतो. गुप्तचर खात्याने विशिष्ट इनपुट दिले होते. त्या इनपुटच्या आधारे नार्कोटिक्स ब्युरोने काम केल्यामुळे बॉलिवूडचे कनेक्शन उघडकीस आले आहे. हे कनेक्शन वरवरचे नाही. आणखीन बरेच खुलासे होण्याची दाट शक्यता आहे, असे प्रधान यांनी स्पष्ट केले.
शाहरुख खान याचा मुलगा आर्यन खान याच्याबरोबरच अरबाज मर्चंट, मुनमुन धमेचा, नुपूर सारिका, इस्मत सिंग, मोहक जयस्वाल, विक्रांत चोक्कर, गोमित चोप्रा या सात जणांना नार्कोटिक्स ब्युरोने ताब्यात घेतले आहे.त्यांच्या चौकशीतून आणखी धक्कादायक खुलासे होणे आणि बॉलिवूडमधली नावे बाहेर येणे अपेक्षित आहेत.
It’s a result of a painstaking investigation that went on for two weeks. We acted on specific intelligence inputs, involvement of some Bollywood links has come to light: NCB chief SN Pradhan
महत्त्वाच्या बातम्या
- सशक्त, आत्मनिर्भर भारतासाठी शपथ घ्या, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे आवाहन
- लालूप्रसादांच्या घरात उफाळून आली भाऊबंदकी, तेजस्वीने लालूंना दिल्लीत कोंडून ठेवल्याचा धाकटा भाऊ तेजप्रतापचा आरोप
- रामदास कदम खोटारडे, शिवसेनेचे माजी आमदार सूर्यकांत दळवींची टीका
- जलयुक्त शिवारमुळे नव्हे, तर नद्यांमधील अवैध वाळू उपशामुळे पूर; फडणवीसांचा ठाकरे – पवार सरकारला टोला