प्रतिनिधी
पुणे : नागपूर ग्रामीणच्या प्रादेशिक परिवहन विभागातील उपपरिवहन अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या पुण्यातील सकाळनगर परिसरातील ‘युधिराज’ बंगल्यावर आयकर विभागाच्या (आयटी) मुंबई येथील पथकाने मंगळवारी सकाळपासून छापेमारी केली. सीआरपीएफच्या जवानांच्या बंदाेबस्तात सदर कारवाई करण्यात येत असून काही महिन्यांपूर्वी ईडीकडून कारवाई झाल्यानंतर आयटीच्या रडारवर खरमाटे असल्याचे यानिमित्ताने समाेर आले आहे. दरम्यान, अायटीच्या अधिकाऱ्यांनी सदर कारवाईबाबत अधिक माहिती देण्यास नकार दिला.IT raid on RTO officer Bajrang Kharmate’s house
ED ANIL DESHMUKH: अनिल देशमुखांच्या वसुली प्रकरणात ईडीने नोंदवला पुण्याच्या डीसीपींचा जबाब …
परिवहन मंत्री अनिल परब यांच्या जवळचे अधिकारी म्हणून बजरंग खरमाटे यांना अाेळखले जाते. भाजप नेते किरीट साेमय्या यांनी मागील वर्षी बजरंग खरमाटे अाणि अनिल परब यांच्यात अार्थिक संबंध असल्याचे कागदपत्रे माझ्या हाती लागल्याचे सांगितले. त्यांच्या मालमत्तेचे फार्म हाऊस, शाेरुम, बांधकाम प्रकल्प याची माहिती माझ्याकडे असून त्याची पाहणी केल्याचे सांगितले. खरमाटे यांच्या ४० प्रकारच्या विविध मालमत्ता बाबतची माहिती ईडी अाणि अायटी विभागाकडे साेमय्या यांनी देत तक्रार केली हाेती. बाजारभावानुसार या मालमत्तेची किंमत ७५० काेटीपर्यंतआहे. खरमाटे व परब यांच्यातील संबंधावरुन लाेकायुक्तकडे ही तक्रार करण्यात आलेली आहे.
खरमाटे पहिल्यापासून संशयाच्या भाेवऱ्यात
बजरंग खरमाटे यांच्या विराेधात ईडीकडे तक्रार आल्यानंतर सप्टेंबर २०२१ मध्ये त्यांची चाैकशी करण्यात आली. खरमाटे २००९ मध्ये रायगड येथे उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हाेते त्यावेळी परदेशातून आयात करण्यात आलेली ४४२ वाहने रिजस्ट्रेशन करताना त्यांनी केंद्रीय माेटार वाहन नयम १९८८चे उल्लंघन केल्याने काेटयावधी रुपयांचे सरकारचे नुकसान झाल्याचा प्रकार घडला हाेता. त्यानंतर उच्च न्यायालयाचे आदेशाने त्यांचे निलंबन करण्यात आले हाेते आणि त्यांची विभागीय चाैकशी करण्यात आली हाेती. परंतु भाजप-शिवसेनेचे सरकार सत्तेत अाल्यानंतर शिवसेनेकडे परिवहन खाते आल्यावर त्यांना पुन्हा नाेकरीत रुजू करण्यात आले. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनीही आक्टाेबर २०२० मध्ये खरमाटे विराेधात राज्याचे मुख्य सचिवांकडे तक्रार करत, महाराष्ट्र-मध्यप्रदेश सीमेवरील वाहनांचे रजिस्ट्रेशन व इतर करण्यासाठी खरमाटे पैसे मागत असल्याचा अाराेप करत कारवाईची मागणी केली हाेती.
IT raid on RTO officer Bajrang Kharmate’s house
महत्त्वाच्या बातम्या
- Islamic State : पुण्याच्या कोंढव्यातील संशयित तल्हा खानच्या घरावर NIA चे छापे; खुरासन प्रांत, अबुधाबी मोड्यूलशी कनेक्शन उघडकीस!!
- पुण्यातील कोंढव्यात एनआयएकडून छापेमारी, दहशतवादी संघटनेच्या संशयितांच्या घराच्या घेतली झडती