नाशिक : “पवार संस्कारित” नेत्यांची मंत्रिपदासाठी तगमग; राष्ट्रवादीने फक्त मराठ्यांना वापरल्याची आत्ता आली समज!!, असे म्हणायची वेळ पवार संस्कारित नेत्यांच्या वक्तव्यातून समोर आली. NCP
पवार संस्कारित नेते आणि सध्या अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असलेले आमदार प्रकाश सोळंके यांनी आपल्याच राष्ट्रवादी काँग्रेसवर जातीयतेचे आरोप केले. राष्ट्रवादी काँग्रेसने मराठ्यांना फक्त वापरले, पण बीड जिल्ह्यामध्ये कायम ओबीसींना मंत्रिपदे दिली. तिथल्या बहुजनांना मंत्रिपदे दिली नाहीत, असा आरोप प्रकाश सोळंके यांनी केला.NCP
बीड जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादीने राजकारण करताना कायम ओबीसी समाजाला प्राधान्य दिले. बीड मधला मराठा समाज तब्बल 45 वर्षे मंत्रीपदापासून वंचित ठेवला. मराठा समाजातले सुंदरराव सोळंके यांना शरद पवारांनी मंत्री केले होते. त्यानंतर कोणालाही बीड जिल्ह्यातून मराठा समाजाच्या कोणालाही कॅबिनेट मंत्री पदाची संधी दिली नाही. कदाचित माझ्या मंत्रिपदाच्या आड माझी जातच येत असावी, असा टोमणा प्रकाश सोळंके यांनी पवार काका – पुतण्यांना हाणला.
प्रकाश सोळंके माजलगाव मधून सलग पाच टर्म आमदार राहिले. धनंजय मुंडे त्यांच्यापुढे निघून गेले. ते काँग्रेस-राष्ट्रवादी सरकारमध्ये मंत्री त्यानंतर आता महायुतीच्या सरकारमध्ये मंत्री झाले, पण प्रकाश सोळंके यांना मंत्रीपदाने हुलकावणी दिली म्हणून संतप्त होऊन प्रकाश सोळंके यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेतृत्वावर थेट जातीयतेचाच आरोप करून टाकला. राष्ट्रवादीने मराठा समाजातल्या नेत्यांनी राज्यमंत्रीपदाची संधी दिली पण राज्यमंत्र्यांना काही अधिकारच नसतात ते फक्त कॅबिनेट दर्जाच्या मंत्र्यांना असतात, याकडेही प्रकाश सोळंके यांनी लक्ष वेधले.
आपण ओबीसी समाजात जन्माला आलो असतो, तर आपल्यावर हा अन्याय झाला नसता पण मराठा समाजात जन्माला आलो म्हणून हा अन्याय झाला असावा, अशी मखलाशी देखील प्रकाश सोळंके यांनी केली.
हे सगळे वक्तव्य करताना प्रकाश सोळंके यांनी ओबीसी समाज आणि बहुजन समाज यांच्यात भेद निर्माण करणारे वक्तव्य केले. त्याचबरोबर पाच टर्म आमदारकी मिळून देखील स्वतःला मंत्रीपद मिळाले नाही, याची खंत व्यक्त करताना स्वतःच्याच पक्षावर मराठ्यांना वापरल्याचा आरोप करून पवारांचे संस्कार उघड्यावर आणले. प्रकाश सोळंके यांच्या वक्तव्यावर अजित पवार किंवा राष्ट्रवादी काँग्रेसने अजून अधिकृत प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसने मराठ्यांचा फक्त वापर केलाय की नाही, हे सांगायला कोणी पुढे आलेले नाही.
It is now understood that the NCP only used the Marathas.
महत्वाच्या बातम्या
- कम्युनिस्टांना गाझाचा कळवळा, उच्च न्यायालयाने खडसावत म्हटले देशाच्या प्रश्नांवर बोला!
- Anjali Damania : धनंजय मुंडे कोणत्याही अंगाने स्वच्छ नाहीत, पुन्हा मंत्रिमंडळात संधी देऊ नये, अंजली दमानिया यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
- Anil Ambani : अनिल अंबानींच्या कंपन्यांवर ईडीचे छापे: ३,००० कोटींच्या कर्ज घोटाळ्याची चौकशी सुरू
- राहुल गांधी म्हणाले, मोदींमध्ये काही दम नाही; मग काँग्रेसवाले मोदींना हरविण्याऐवजी त्यांच्या रिटायरमेंटची का वाट बघताहेत??