प्रतिनिधी
मुंबई : राज्यसभा निवडणुकीत संजय पवारांच्या पराभवानंतर संजय राऊतांनी अपक्ष आमदारांना फटकारले आणि शिवसेनेला मते न दिलेल्या आमदारांची नावे राऊतांनी जाहीर केली. त्यामुळे संजय राऊतांनी राज्यसभेच्या निवडणुकीत आचारसंहितेचा भंग केल्याचा आरोप भाजपचे किरीट सोमय्या यांनी केला आहे. इतकेच नाही तर राऊत यांनी राज्यसभा निवडणुकीत भाजपला मतदान करणाऱ्या ६ अपक्ष/अन्य आमदारांची नावे जाहीर केली. हा गोपनीयतेचा भंग नाही का?, असा सवालही निवडणूक आयोगाला केला आहे. Isn’t it a breach of confidentiality to announce the names of MLAs?
– आचारसंहिता उल्लंघन
तसेच सोमय्यांनी हा सवाल करत निवडणूक आयोगाने निवडणूक आचारसंहितेच्या उल्लंघनाकडे लक्ष देण्याची विनंती केली आहे. पुढे ते म्हणाले, राऊतांना शिवसेनेला मत न दिलेल्या आमदारांची नावे कशी कळाली? तुम्ही 6 आमदारांची नावे कशी आणि का घेतली? ते तुमच्या स्वप्नात आले होते का? असे सवाल सोमय्या यांनी केले आहेत. शिवसेनेकडून आता निवडणुकांची माफियागिरी होत आहे, त्यांनी आमदारांची नावे कोणत्या आधारे घेतले आहेत? असे प्रश्न सोमय्यांनी माध्यमांसमोर शिवसेनेसह राऊतांना विचारले आहेत.
– राऊतांनी अपक्ष आमदारांना डिवचले
राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीच्या उमेदवारांना मतदान करण्याचा ज्यांनी कोणी शब्द देऊन दगाबाजी केली त्या सहा अपक्ष आमदारांची नावे आमच्याकडे आहेत. शिवसेनेचे संजय पवार यांच्या पराभवासाठी भाजपने पैशांचा पाऊस पाडला, असा आरोप शिवसेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला. संजय पवारांचा पराभव शिवसेनेला चांगलाच जिव्हारी लागला आणि राऊतांनी गद्दारी करणाऱ्या आमदारांची नावे जाहीर करून टाकली आहेत. घोड्यांना हरभरे टाकले की ते कुठेही जाऊ शकतात, अशी टीका त्यांनी केली होती.
Isn’t it a breach of confidentiality to announce the names of MLAs?
महत्वाच्या बातम्या
- गुड न्यूज : येत्या काळात खाद्यतेल आणखी होणार स्वस्त; 9 % घसरण
- राज्यसभा निवडणूक : शिवसेनेला झटका आणि नवाब मलिकांच्या तुरुंगातील वर्तणुकीच्या बातमीचा योगायोग!!
- पाकिस्तानचे माजी लष्करशहा अत्यवस्थ : कुटुंबीय म्हणाले- आता ते बरे होण्याची शक्यता नाही, सर्व अवयवांनी काम करणे थांबवले
- विधान परिषद निवडणूक : दुधाने तोंड पोळले तरी संजय राऊत ताक फुंकून प्यायला शरद पवारांकडे!!