• Download App
    ...आता अली जनाब वगैरे उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? - देवेंद्र फडणवीसांचा सवाल! Is Uddhav Thackeray proud to be called Ali Janab Devendra Fadnavis

    …आता अली जनाब वगैरे उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? – देवेंद्र फडणवीसांचा सवाल!

    ”…त्यांना याचं उत्तर कधीतरी स्व.बाळासाहेब ठाकरेंना द्यावं लागेल.” , असंही फडणवीस म्हणाले आहेत.

    विशेष प्रतिनिधी

    ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांची आज मालेगावमध्ये सभा आहे. या सभेसाठी ठाकरे गटाकडून जोरदार तयारी करण्यात आली आहे. बॅनरबाजीही केली आहे, विशेष म्हणजे उर्दू भाषेतही बॅनर झळकले आहेत. ज्यामध्ये उद्धव ठाकरेंचा अली जनाब असा उल्लेख करण्यात आला आहे. या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना प्रसारमाध्यमांनी प्रतिक्रिया विचारली असता, त्यावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली आहे. Is Uddhav Thackeray proud to be called Ali Janab Devendra Fadnavis

    राहुल गांधींनी ट्विटरचा बायो अपडेट करत स्वतःला ‘अपात्र खासदार’ संबोधले; पाहा नेमकं काय लिहिलं आहे?

    “मला असं वाटतं की आता हे मला विचरण्यापेक्षा त्यांनाच आपण विचारा, की आता त्यांना हे भूषणावह वाटतं का? अली जनाब वगैरे जे काही आहे ते उद्धव ठाकरे यांना भूषणावह वाटतं का? हे त्यांना विचारा. पण मला वाटतं त्याला काही हरकत नाही, शेवटी उर्दू ही एक भाषा आहे, त्यामुळे भाषेतही कोणी काही म्हटलं तर हरकत नाही. आमचं म्हणणं एवढंच आहे, आम्ही कोणत्याही धर्माविरोधात नाही, आम्ही लांगुलचालनाच्या विरोधात आहोत. आता जर काँग्रेस  राष्ट्रवादीसोबत जाऊन ते लांगुलचालन करत असतील, तर त्यांना याचं उत्तर कधीतरी स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांना द्यावं लागेल.” असं देवेंद्र फडणवीस म्हणाले आहेत.

    तर मालेगावात उद्धव ठाकरेंच्या बॅनरवर, “अब हमे जितने तक लढना हैं : अली जनाब उद्धव साहब ठाकरे” असं उर्दू भाषेत लिहिलं आहे ज्यावर त्यांचा फोटो देखील आहे.

    शिवसेना हे नाव आणि धनुष्यबाण हे पक्षचिन्ह गमावल्यानंतर उद्धव ठाकरे संघटनेच्या एकजुटीसाठी सध्या राज्यभर सभा घेत आहेत. नुकतीच त्यांनी कोकणात खेडमध्ये सभा घेतली होती. जिथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपावर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता आज नाशिकमधील मालेगावात त्यांची सभा होत आहे.

    Is Uddhav Thackeray proud to be called Ali Janab Devendra Fadnavis

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस