• Download App
    राष्ट्रवादी भाजप बरोबर जाणार नाही, ज्यांना जायचे असेल तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय; पवारांचे हे "साधे" वक्तव्य की "ऑफर"?? Is sharad Pawar "offering" NCP MLAs to go to BJP camp on personal basis??

    राष्ट्रवादी भाजप बरोबर जाणार नाही, ज्यांना जायचे असेल तो त्यांचा व्यक्तिगत निर्णय; पवारांचे हे “साधे” वक्तव्य की “ऑफर”??

    विशेष प्रतिनिधी

    नवी दिल्ली : शिवसेना जशी फोडली तशीच राष्ट्रवादी फोडण्याचा भाजपचा डाव आहे, असा दिल्लीतल्या पत्रकार परिषदेत संजय राऊत यांनी पुन्हा एकदा आरोप केला आहे. ईडी, सीबीआय यांच्यासारख्या केंद्रीय तपासणी धरणांचा वापर करून भाजप राष्ट्रवादीच्या आमदारांवर दबाव आणत आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे

    मात्र त्याचवेळी त्यांनी शरद पवार यांच्या एका वक्तव्याचा हवाला दिला आहे, तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस भाजपा बरोबर जाणार नाही. ज्यांना जायचे असेल त्यांनी पक्ष सोडून जावे. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असेल, असे शरद पवारांनी उद्धव ठाकरेंशी सिल्वर ओकवर झालेल्या भेटीतच स्पष्ट केले आहे, असे संजय राऊत यांनी सांगितले. मात्र पवारांचे हे वक्तव्य खरे असेल तर राष्ट्रवादी काँग्रेस मधील फूट रोखण्यासाठी त्यांनी हे वक्तव्य केले आहे, की राष्ट्रवादीतल्या “अडचणीत” आलेल्या आमदारांना पक्ष सोडण्याची “खुली ऑफर” त्यांनी दिली आहे??, असा सवाल तयार झाला आहे.

    राष्ट्रवादीची सत्तेबाहेर घुसमट

    याचे कारण पवारांचे राजकारण एकपक्षीय नसून ते बहुपक्षीय असते. एकाच वेळी वेगवेगळ्या पक्षांमध्ये ते त्यांची माणसे “पेरून” आपले राजकारण साधू पाहत असतात. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेबाहेर होऊन 9 महिने उलटून गेले आहेत. सत्तेबाहेर राष्ट्रवादीची घुसमट होत आहे. सत्तेबाहेर असलेली राष्ट्रवादी काँग्रेस रस्त्यावर फार मोठा संघर्ष करून जनमताचा कौल मिळवून सत्तेवर येऊ शकत नाही याची पक्की जाणीव पवारांसारख्या कसलेल्या बेरकी नेतृत्वाला आहे. त्यामुळे सत्तेसाठी कोणत्याही प्रकारची तडजोड करायला ते मागेपुढे पाहत नाहीत, हा आतापर्यंतचा इतिहास आहे.

    “खुली ऑफर”

    अशा स्थितीत ज्यावेळी शिवसेना – भाजप यांचे शिंदे – फडणवीस सरकार पूर्णपणे स्थिर आहे. कोणत्याही राजकीय हालचाली करून ते अस्थिर करता येणार नाही अथवा पाडता येणार नाही याची पक्की जाणीव झाल्यानंतर पवारांनी कदाचित आपली खेळी बदलून राष्ट्रवादीच्या आमदारांना “व्यक्तिगत निर्णय” घेऊन भाजपच्या पारड्यात निघून जाण्याची “खुली ऑफर” दिली असू शकते. या ऑफर मधून राष्ट्रवादी काँग्रेस कदाचित अधिकृतरित्या सत्तेत सहभागी होऊ शकणार नाही, पण राष्ट्रवादीचे काही आमदार मात्र सत्तेचा मार्ग स्वतःसाठी खुला करून घेऊ शकतील आणि तो अंतिमतः शरद पवारांच्याच राजकीय आर्थिक भांडवलीकरणाच्या राजकारणाला उपयोगी पडू शकेल.

    संजय राऊत यांच्या सामनातल्या कालच्या रोखठोकचा आणि दिल्लीतल्या आजच्या पत्रकार परिषदेतील वक्तव्याचा तोच अर्थ निघू शकतो, असे दिसत आहे.

    Is sharad Pawar “offering” NCP MLAs to go to BJP camp on personal basis??

    महत्वाच्या बातम्या 

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल