प्रतिनिधी
मुंबई : या देशात जो उठतो, तो महापुरुषांची बदनामी करतो. आपल्याच महापुरुषांची बदनामी ताबडतोब थांबली पाहिजे. राहुल गांधी सावरकरांवर बोलतो. सावरकरांनी जे केले तो रणनीतीचा भाग होते. पण हे ज्याला कळले नाही, तो गुळगुळीत मेंदूचा आहे. राहुल गांधींची लायकी तरी आहे का सावरकरांना बोलायची?, अशा शब्दात मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी आज हल्लाबोल केला. त्याचवेळी त्यांनी राज्यपाल भगतसिंह कोशियारी यांच्याविरुद्ध देखील शरसंधान साधले. गोरेगावातील नेस्को संकुलात मनसैनिकांना ते संबोधित करत होते. Is Rahul Gandhi smooth brained, worthy to speak on Savarkar?
राज ठाकरे यांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे
- गटाध्यक्षांनी माझ्या विभागाध्यक्षांवर आणि इतर पदाधिकऱ्यांवर अंकुश ठेवावा. तुम्ही तुमचं काम चोख करा. आणि कोणी कामचुकारपणा करत असेल तर मला सांगा मी त्यांच्याकडे बघून घेईन. मला माझ्याभोवती हुजऱ्यांची गर्दी नको आहे.
- माझी महाराष्ट्र सैनिकांना विनंती आहे, येणाऱ्या निवडणुकीत जी जबाबदारी मिळेल ती जोरकसपणे पार पाडा. मी तुम्हाला शब्द देतो, हा राज ठाकरे तुम्हाला महापालिका जिंकून दाखवेल.
- गटाध्यक्षांना माझं आवाहन आहे की तुम्ही तुमचं काम व्यवस्थित करा, आपली कामं लोकांपर्यन्त पोहचवा, मी तुम्हाला शब्द देतो मी मुंबई महापालिका तुमच्या हातात देईन.
- आपली आदराची स्थानं तरी कोणती? सर्व महापुरुषांवर चिखलफेक सुरु आहे. प्रत्येक व्यक्तीत गुण-दोष असतात ते स्वीकारा. त्यातून जे प्रगतीसाठी उपयुक्त आहे ते घ्या आणि पुढे चला.
- आज देशासमोर किती गंभीर प्रश्न आहेत त्यावर बोलूया आता. महापुरुषांवर चिखलफेक करून आपण काय साध्य करतोय? पुढच्या पिढयांना कोणता आदर्श ठेवणार आहोत? प्रत्येक माणूस गुणदोषांसकट स्वीकारा. प्रत्येकाच्या दोषांवर बोटं ठेवू नका. दुसऱ्यांच्या गुणांविषयी पण बोला.
- मध्यंतरी पंडित नेहरूंचा एक फोटो समोर आला, ज्यात एक लहान मुलगी नेहरूंचं चुंबन घेत होती, त्यावर नेहरूंच्या चारित्र्यावर शिंतोडे उडवले गेले. अरे ती नेहरूंची नातेवाईक होती. कसले घाणेरडे आरोप करत सुटायचं. एकमेकांनी एकमेकांवर आरोप करत सुटायचं हे बंद करा
- माझं काँग्रेस आणि भाजपा ह्या दोन्ही पक्षांना आवाहन आहे… सावरकर, नेहरू, टिळक ह्यांची बदनामी थांबवा. ह्यातून काय साध्य होतं? बस्स, झालं आता. ह्या देशासमोर आजचे जे ज्वलंत प्रश्न उभे आहेत त्यावर लक्ष देऊ या.
- राहुल गांधी गुळगुळीत मेंदूचे आहेत. राहुल गांधी सावरकरांवर बोलणार, भाजप नेहरूंबद्दल बोलणार, मग अजून कोणतरी अजून एखाद्या महापुरुषांवर बोलणार. हे किती दिवस चालणार, ज्यांनी देशासाठी आयुष्य दिलं त्या सगळ्या महापुरुषांना का बदनाम करताय?
- राहुल गांधींची लायकी आहे का सावरकरांबद्दल बोलायची? अहो, सावरकरांनी जे केलं तो रणनीतीचा भाग होता. जेलमध्ये सडण्यापेक्षा बाहेर येऊन मला जो लढा द्यायचा तो देऊ या. ही रणनीती ज्याला कळत नाही तो गुळगुळीत मेंदूचा.
- गेल्या ५ वर्षात पाच लाख उद्योजक देश सोडून परदेशात निघून गेले. देशांत फक्त जात-पात आणि महापुरुषांच्यावर टीका करणं इतकंच सुरु आहे. मध्यंतरी महाराष्ट्रात म्हैसूर सॅन्डल सोप (राहुल गांधी ) हे सावरकरांबद्दल वाट्टेल ते बरळून गेले. काय माहिती आहे सावरकरांबद्दल तुम्हाला?
- महाराष्ट्रातला एक मंत्री दूरदर्शनवर महाराष्ट्रातील महिला नेत्याला अर्वाच्च भाषेत शिवीगाळ करतो. महाराष्ट्राचं राजकारण इतकं रसातळाला गेलं. हे असंच सुरु ठेवायचं असेल तर महापुरूषांचं नाव घेणं बंद करा.
- ही असली घाणेरडी राजकीय संस्कृती आपण माध्यमातून तरुण मुलांसमोर ठेवणार असू तर ही तरुण मुलं काय शिकणार? महाराष्ट्रातून अनेक तरुण-तरुणी नोकरीसाठी परदेशात जात आहेत, का तर महाराष्ट्रात आता फक्त जातीपातीच राजकारण सुरु आहे, सगळं वातावरण प्रदूषित झालं आहे.
- कोश्यारी म्हणतात, गुजराती-मारवाडी परतले तर मुंबईचं महत्त्व कमी होईल. कोश्यारी गुजराती-मारवाडी समाजाला विचारा उद्योगासाठी महाराष्ट्र का निवडला? कारण इथलं उद्योगस्नेही वातावरण त्यांना आकर्षित करतं. कोश्यारींकडून महाराष्ट्र समजून घेण्याची मराठी माणसाला गरज नाही.
- सध्या अनेक पक्षांच्या प्रवक्त्यांची टीव्हीवरची भाषा घसरत चालली आहे. महाराष्ट्रातील एक मंत्री एका महिला नेत्याबद्दल अपशब्द काढतो. इतकी पातळी खाली गेली आपली? काही प्रवक्ते तर बोन्सायच्या झाडाएवढे असतात, पण आपली लायकी विसरून बोलत सुटतात.
- ह्या देशावर हिंद प्रांतावर जर १५० वर्ष कोणी राज्य केलं असेल तर आमच्या मरहट्ट्यानी केलं आहे. महाराष्ट्र मोठा होताच आणि राहील. उद्योगधंद्यासाठी महाराष्ट्रतलं वातावरण पोषक आहे आणि म्हणून सगळ्यांची इच्छा महाराष्ट्रात उद्योगधंदा थाटायची इच्छा आहे.
- महाराष्ट्रातले उद्योग बाहेर जात आहेत. काय चाललंय काय? ते फक्त गुजरातमध्ये जातायत म्हणून मला खंत नाही. देशातल्या कोणत्याही राज्यात जावेत, खंत ती नाहीच. पण पंतप्रधान प्रत्येक राज्याकडे समान पद्धतीने बघतील अशी अपेक्षा होती. मग हे असं का घडतंय?
- महाराष्ट्रातून इतके उद्योग गुजरातला चालला आहेत, ह्यावर धोतर (राज्यपाल कोशियारी) का नाही बोलले? गुजराती आणि मारवाडी महाराष्ट्रातून गेले तर महाराष्ट्राचं काय होईल, असं कोशियारी म्हणाले, माझा प्रश्न आहे की मग गुजराती मारवाडी त्यांचं राज्य सोडून महाराष्ट्रात का आले?
- महाराष्ट्रातून एकामागोमाग एक प्रकल्प बाहेर जात आहेत. मला प्रोजेक्ट गुजरातमध्ये गेल्याच वाईट नाही वाटत आहे, ते एखाद्या मागासलेल्या राज्यात गेला असता तरी हरकत नव्हती. देशातील प्रत्येक राज्य प्रगत होऊ दे, पण मोदींनी फक्त गुजरात गुजरात करू नये ही अपेक्षा आहे.
Is Rahul Gandhi smooth brained, worthy to speak on Savarkar?
महत्वाच्या बातम्या
- बुद्धिवादी राष्ट्रवादी नेता हीच सावरकरांची खरी ओळख; दिल्लीच्या ‘प्रेस कॉन्फरन्स’मध्ये रणजित सावरकरांचे रॅपिड फायर
- ITBP Recruitment : इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीस फोर्समध्ये नोकरीची संधी, करा अर्ज
- Imam Remuneration : मशिदींच्या इमामांना करदात्यांच्या पैशातून वेतन हे संविधानाचे हनन; केंद्रीय माहिती आयुक्तांचा निर्णय