विशेष प्रतिनिधी
मुंबई : 2024 च्या विधानसभा निवडणुकीत सिंचन घोटाळ्याचा विषयच समोर आलेला नसताना स्वतः अजित पवारांनीच तो विषय काढला आणि काँग्रेस आणि बाकीच्या पक्षांना बोलायची संधी दिली. त्यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी अजितदादांवर कुरघोडी करायची संधी घेतली. Irrigation scam remember ajit pawar
वास्तविक सिंचन घोटाळ्याचा विषय 2014 च्या निवडणुकीत प्रचंड तापला होता. भाजपने शरद पवारांच्या राष्ट्रवादीला पूर्णपणे घेरून त्या मुद्द्यावर हैराण केले होते पवारांची राष्ट्रवादी सैरभैर झाली होती. त्या निवडणुकीत राष्ट्रवादीला एवढा जबरदस्त फटका बसला की त्यांचे आमदार 44 वर येऊन बसले. पवारांना सत्ता गमवावी लागली. नंतर देखील सिंचन घोटाळ्याचा विषय संपूर्ण पवार नावाच्या फॅमिलीला आणि राष्ट्रवादीला त्रास देत राहिला.
Zelensky : झेलेन्स्की म्हणाले- मोदी युद्धावर प्रभाव टाकू शकतात; दुसरी युक्रेन पीस समिट भारतात व्हावी
पण 2024 च्या निवडणुकीत सिंचन घोटाळ्याच्या विषयाचा मागमूस देखील उरला नव्हता. पण अजित पवारांनी तासगाव मध्ये जाऊन तो विषय काढला. त्याचे खापर तत्कालीन गृहमंत्री आर. आर. आबा पाटील यांच्यावर फोडले त्यांनीच गृहमंत्री म्हणून सिंचन घोटाळ्याच्या चौकशीच्या फाईलवर सही केली, हे मला देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री झाल्यावर बोलवून सांगितले. ती फाईल दाखवली. त्यावर खरंच आर. आर. आबांची सही होती. आबांनी माझा केसाने गळा कापला, असा आरोप अजितदादांनी केला. पण त्यामुळे सिंचन घोटाळ्याच्या 70 हजार कोटींचा विषय पुन्हा ऐरणीवर आला.
पृथ्वीराज चव्हाण यांनी त्या विषयावरून अजितदादांना घेरले. मी ज्यावेळी चौकशीचे आदेश दिले त्यावेळी 70 हजार कोटी हा आकडा पण नव्हता. सिंचन घोटाळ्याचे फाईल माझ्याकडे सहीला पण आली नव्हती. पण अजितदादांनी उगाच माझे सरकार पाडले आता तो घोटाळा त्यांची पाठ सोडायला तयार नाही, असा टोला पृथ्वीराज चव्हाण यांनी हाणला.
Irrigation scam remember ajit pawar
महत्वाच्या बातम्या
- Congress अखेर 100 + पार; महाविकास आघाडीतल्या जागावाटपात ठाकरे + पवारांवर मात!!
- Sharad Pawar : यंदाच्या निवडणुकीत पवारांची यंग ब्रिगेड मैदानात, पण सगळे घराणेशाहीचे प्रतिनिधी!!
- Akhilesh Yadav : अखिलेश यादव यांचा महाराष्ट्रातील जागावाटपावरून ‘मविआ’ला इशारा!
- Siddhi Kadam रमेश कदम यांच्या मुलीला शरद पवारांनी दिली मोहोळमधून उमेदवारी, सर्वात कमी वयाची उमेदवार