• Download App
    Irrigation scam सिंचन घोटाळ्याची फाईल शिलगावली,

    Irrigation scam : सिंचन घोटाळ्याची फाईल शिलगावली, राष्ट्रवादीची अंडी पिल्ली बाहेर आली, पवारांच्या अनुयायांमध्ये जुंपली!!

    Irrigation scam

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : Irrigation scam  2024 च्या विधानसभा निवडणुकीत सिंचन घोटाळ्याची फाईल स्वतः अजितदादांनीच शिलगावली. त्यामुळे राष्ट्रवादीची जुनी अंडी पिल्ले बाहेर आली. दोन्ही राष्ट्रवादीतले नेते अस्वस्थ झाले आणि त्यांनी एकमेकांना घेरायला सुरुवात केली.Irrigation scam

    आर. आर. आबा पाटील यांनी त्या फाईलवर सही करून आपल्याला कसे अडचणीत आणले, असे सविस्तर वर्णन तासगावात जाऊन केले. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते भडकले आणि त्यांनी अजितदादासकट देवेंद्र फडणवीस यांनाही घेरले.

    सिंचन घोटाळ्यात 70000 कोटींचा आरोप झाल्यावर आर. आर. आबा पाटलांनी गृहमंत्री म्हणून ओपन इंक्वायरी करण्याचे आदेश त्या फाईलवर त्यांनी सही केली. ही सही मला देवेंद्र फडणवीस यांनी ते मुख्यमंत्री झाल्यावर स्वतःहून दाखवली, असा गौप्यस्फोट अजितदादांनी तासगावात केला.



    त्यावर आर. आर. आबांचे चिरंजीव आणि तासगावचे उमेदवार रोहित पाटील चिडले. त्यांनी अजित पवारांना प्रत्युत्तर दिले पण त्या पाठोपाठ सुप्रिया सुळे देखील अस्वस्थ झाल्या कारण राष्ट्रवादीतील जुनी अंडी पिल्ली बाहेर आली. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आणि अजित पवार विरोधी पक्षात असताना फडणवीस यांनी अजित पवारांना बोलवून फाईल दाखवलीस कशी??, असा सवाल त्यांनी केला. त्याचबरोबर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अजित पवार आणि फडणवीस यांच्या पॉलिटिकल कॅरेक्टर वर बोट ठेवले.

    सिंचन घोटाळ्यातील फाईल काँग्रेस – राष्ट्रवादीच्याच सरकारमध्ये तयार झाली. पण आता आर. आर. आबा नाहीत. त्यामुळे त्या विषयावर बोलणे योग्य होणार नाही, एवढ्या एका वाक्यात फडणवीसांनी तो विषय बाजूला टाकला.

    पण या सगळ्यात राष्ट्रवादीची जुनी अंडी पिल्ली बाहेर आल्याने दोन्ही राष्ट्रवादीतले नेते, पवारांचे शिष्य अस्वस्थ झाले. आता अजितदादांनी शिलगावलेली फाईल आणखी कोणा कोणाला भ्रष्टाचाराच्या आगीच्या लपेट्यात घेणार, या भीतीने दोन्ही राष्ट्रवादीतले नेते अस्वस्थ झाले.

    Irrigation scam haunt NCP SP again

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ