कृष्ण प्रकाश यांनी या कामगिरीचा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर केला आहे, जो प्रचंड व्हायरल होत आहे.
विशेष प्रतिनिधी
मुंबई : पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त, आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा गुहा पर्यंत पोहण्याची महाअवघड कामगिरी पूर्ण केली आहे. याचबरोबर अशी कामगिरी करणारे ते जगातील पहिले व्यक्ती ठरले आहे. Ironman Krishna Prakash sets world record in swimming
प्राप्त माहितीनुसार, रविवार, २६ मार्च रोजी आयपीएस अधिकारी कृष्ण प्रकाश यांनी लाटांच्या विरुद्ध पोहताना १६.२० किलोमीटरचे अंतर कापले आहे. यासाठी त्याला ५ तास २६ मिनिटे लागली. मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया येथून सकाळी ७.४५ वाजता त्यांनी समुद्राच्या लाटांच्या विरोधात पोहण्यास सुरुवात केली होती. सहसा बाकीचे जलतरणपटू एलिफंटा गुहा आणि गेटवे ऑफ इंडिया दरम्यान समुद्राच्या लाटांसह पोहतात.
लाटांच्याविरुद्ध पोहून रचला इतिहास –
या कामगिरीचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतं आहे, जो कृष्ण प्रकाश यांनी ट्वीटरवर शेअर देखील केला आहे. त्यांच्या मते, त्यांची ही साहसी कामगिरी ‘बुडणे प्रतिबंधक जागरूकता’ ला समर्पित आहे. या, व्हिडिओमध्ये, कृष्ण प्रकाश मुंबईतील गेटवे ऑफ इंडियावरून समुद्रात उडी मारून पोहायला सुरुवात करताना आणि एलिफंटा लेणीजवळ संपवताना दिसत आहेत.
ट्वीटद्वारे दिली कामगिरीची माहिती –
आयपीएस अधिकारी कृष्णा प्रकाश यांनी स्वत: त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून याबाबत माहिती दिली. “मी आज गेटवे इंडिया ते एलिफंटा लेणीपर्यंत पोहण्याची कामगिरी पूर्ण करणारा जगातील पहिली व्यक्ती ठरलो आहे. अनेकांनी एलिफंटा ते गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेनं पोहण्याचा विक्रम केला आहे. परंतु, मी त्याविरुद्ध म्हणजेच गेट ऑफ इंडिया ते एलिफंटा या दिशेनं पोहण्याचे ठरवलं. मी ५ तास आणि २६ मिनिटांत १६.२० किलोमीटर पोहून पूर्ण केलं. यामुळे भारतीय जलतरणपटूंना स्विमिंगमध्ये ऑलिम्पिक पदक जिंकण्यासाठी प्रेरणा मिळेल.”, असा विश्वास कृष्णा प्रकाश यांनी व्यक्त केला आहे.
Ironman Krishna Prakash sets world record in swimming
महत्वाच्या बातम्या
- महागाई डायन बेडरूममध्ये…, युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास यांची स्मृती इराणींवर अश्लाघ्य शब्दांत टीका
- उत्तरप्रदेश : मानव-पक्षी मैत्रीचा विचित्र शेवट; जखमी अवस्थेतील ‘सारस’ घरी आणून १३ महिने जीव लावला अन्
- राहुलजींकडून सावरकरांचा अपमान; ठाकरेंनी कान टोचले, भाजप – शिवसेनेने सुनावले, तर भुजबळांनी पण डिवचले!!; ठाकरे – काँग्रेस काय करणार??
- पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाला मागितली तीन कोटींची खंडणी; दोघांना अटक