कोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर IPL स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या अनेक संघांमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. अनेक संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला. IPL suspended in the wake of Corona’s havoc, BCCI’s big decision, players of many teams infected
विशेष प्रतिनिधी
मुंबई : कोरोना विषाणूच्या वाढत्या उद्रेकाच्या पार्श्वभूमीवर IPL स्पर्धा स्थगित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. गेल्या काही दिवसांपासून आयपीएलच्या अनेक संघांमधील खेळाडूंना कोरोनाची लागण झाल्याचे दिसून आले आहे. यानंतर बीसीसीआयने हा निर्णय घेतला आहे. अनेक संघातील खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यानंतर हा निर्णय घेण्यात आला.
कोरोना महामारीदरम्यान बीसीसीआयने ‘बायो-बबल’चा हवाला दिला होता, यानंतर 29 सामने यशस्वीरीत्या पार पडले. चेन्नई आणि मुंबईतील सर्व सामन झाले. परंतु अहमदाबादेतील नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये या हंगामाील 30 वा सामना होऊ शकला नाही.
वास्तविक, आज होणाऱ्या मुंबई-सनरायझर्स सामन्याबद्दल आधीच चिंता होती, कारण शनिवारी मुंबई इंडियन्स हे सीएसकेविरुद्ध खेळले होते. या सामन्यादरम्यान बालाजी संघातील अनेक खेळाडूंच्या संपर्कात आले होते. आणि आता सनरायझर्सच्या वृध्दिमान साहा कोरोना पॉझिटिव्ह आढळल्याची बातमी आली आहे. केकेआरचा वरुण चक्रवर्ती आणि संदीप वारियर याआधीच पॉझिटिव्ह आढळले होते.
IPL suspended in the wake of Corona’s havoc, BCCI’s big decision, players of many teams infected
महत्त्वाची बातमी
- भारताचे पहिले लढाऊ विमान सुपरसॉनिक ‘तेजस’ची निर्मिती करणाऱ्या पद्मश्री मानस बिहारींचे निधन, कलामांसोबतही केले होते काम
- बिहारमध्ये 15 मेपर्यंत लॉकडाऊन, मुख्यमंत्री नीतीश कुमार यांचे मार्गदर्शक सूचना जारी करण्याचे प्रशासनाला निर्देश
- बंगालमधील हिंसाचारावर माकपचीही टीका, येचुरी म्हणाले- हिंसा निंदनीय, ममतांनी विजयोत्सव सोडून महामारीवर लक्ष द्यावे
- बंगालमध्ये भाजप उमेदवार गोवर्धन दास यांच्या घरावर तृणमूलच्या गुंडांचा बॉम्बहल्ला, गृहमंत्री अमित शाहांनी पाठवली मदत