वृत्तसंस्था
मुंबई : गेल्या काही महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांचा शोध घेण्यासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी कंबर कसली आहे त्यांचा ठावठिकाणा मिळविण्यासाठी सक्तवसुली संचालनालय, (ईडी) केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाला (सीबीआय) कळविले असल्याचे वृत्त आहे. त्यांना पकडण्यासाठी सीबीआयकडून विविध ठिकाणी छापेमारी केली जाण्याची शक्यता आहे. investigation agency start search for anil Deshmukh
मनी लाँड्रिंगच्या गुन्ह्याप्रकरणी ईडीने पाच महिन्यांत चौकशीला हजर राहण्यासाठी पाच वेळा समन्स त्यांना बजावले होते. पण ते एकदाही हजर झाले नाहीत. सीबीआयने त्यांच्या कार्यालय व घरावर पाचवेळा छापे टाकले आहेत. देशमुख यांनी कारवाई रद्द करण्यासाठी न्यायालयात धाव घेतली. मात्र, त्यांना दिलासा मिळाला नाही. सीबीआय व ईडीकडून अटकेची कारवाई होण्याची शक्यता आल्यामुळे ते गुप्त ठिकाणी राहत आहेत. पण, कोठे याचा तपास सुरू केला जाणार आहे. त्यांना बारामतीकरांनी लपवून ठेवल्याचा आरोप होत आहे. ते नक्की कोठे लपले आहेत, याचा शोध घेण्यासाठी विविध ठिकाणी छापे टाकले जाणार असल्याचे कळते. वरिष्ठांनी त्यांचा शोध घेण्याच्या सूचना दिल्याने पुन्हा गतीने हालचाली करण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
investigation agency start search for anil Deshmukh
महत्त्वाच्या बातम्या
- भाजप उभा करेल सिल्वासात उभा छत्रपती शिवरायांचा भव्य अश्वारूढ पुतळा
- शिल्पा शेट्टी आणि राज कुंद्रा यांनी शर्लिन चोप्राविरोधात उचलले मोठे पाऊल , 50 कोटींचा मानहानीचा दाखल केला खटला
- भारताने कोरोना लसीकरणात 99 कोटींचा टप्पा गाठला, केंद्रीय आरोग्य मंत्री मनसूख मांडविया यांनी ट्विटरवरून दिली माहिती
- ‘टार्गेट किलींग ‘ प्रकरणाचा तपास एनआयएकडे सोपवण्यात आला, एजन्सी करेल पाकिस्तानचा पर्दाफाश
- CONGRESS : नाना पटोलेंच्या नेतृत्वावरून काँग्रेसमध्ये नाराजी ; दहा वर्षांपासून प्रवक्ते असणारे सचिन सावंत यांचा राजीनामा