• Download App
    केंद्रीय तपास यंत्रणांचा घरात घुसून ससेमिरा; अस्वस्थ पवार - ठाकरेंची पुन्हा चर्चाinto the house of the Central Investigation Agency

    केंद्रीय तपास यंत्रणांचा घरात घुसून ससेमिरा; अस्वस्थ पवार – ठाकरेंची पुन्हा चर्चा

    प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात सह्याद्री अतिथीगृहावर झालेल्या चर्चेला एकच दिवस उलटल्यानंतर आज पुन्हा एकदा चर्चा झाल्याचे समजते.into the house of the Central Investigation Agency

    केंद्रीय तपास यंत्रणांचा ससेमिरा शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांनी मागे लागला आहे एकापाठोपाठ एक केसेस सुरू होताना दिसत आहेत पण त्यांना न घाबरता त्यांच्याविरोधात एकत्रितपणे लढा देण्याची रणनीती ठरविण्यासाठी शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.


    मुत्र शब्दप्रयोग :अजित पवारांचा आणि राज ठाकरेंचा साम्य आणि विरोध…!!


    सध्या सरकारमधील एकामागोमाग एक अशा मंत्र्यांच्या मागे केंद्रीय तपास यंत्रणांचा चौकशीचा ससेमिरा लागला आहे. पण आता तर केंद्रीय तपास यंत्रणा थेट शरद पवारांच्या घरात घुसल्या आहेत. त्यामुळे पवार कुटुंबामध्ये चांगलीच अस्वस्थता वाढली आहे. याच तपास यंत्रणा आधीच मुख्यमंत्री ठाकरे यांच्या मागे लागलेल्या आहेत. त्यामुळे यातून मार्ग कसा काढायचा याकरता एनसीपीचे अध्यक्ष शरद पवार यांनी थेट वर्षा बंगला गाठून त्यांच्याशी अर्धा तास चर्चा केल्याचे समजते.

    महाविकास आघाडीतील अनिल देशमुख, अनिल परब, एकनाथ खडसे, भावना गवळी अशा नेत्यांच्या मागे सध्या सक्त वसुली संचलनालय अर्थात ईडीचे शुल्ककाष्ट लागलेले आहे. भाजपाकडून केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करुन महाविकास आघाडी सरकारला बदनाम करण्याचा घाट घातला जात आहे. यामध्ये विशेष करून शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या मंत्र्यांना टार्गेट केले जात आहे. म्हणून सध्या या दोन्ही पक्षांमध्ये अधिक अस्वस्थता आहे. म्हणून यावर गांभीर्याने चर्चा करण्यासाठी ही बैठक पार पडली आहे. आता या यंत्रणांना न घाबरता त्यांच्याविरोधात एकत्रितपणे लढा देण्याचा निर्णय महाविकास आघाडीतील घटकपक्षांनी घेतला आहे. मात्र त्याकरता रणनीती काय असावी याकरता शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यात जवळपास अर्धा तास चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे.

    दरम्यान, जरंडेश्वर साखर कारखाना खरेदी-विक्री व्यवहाराविरोधात पुरावे देण्यासाठी भाजप नेते आणि माजी खासदार किरीट सोमय्या ईडी कार्यालयात दाखल झाले. त्यांनी ईडीकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली. त्यावेळी त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याबाबतचे पुरावे ईडी आणि आयकर विभागाला दिले. याप्रसंगी किरीट सोमय्या हे ईडी कार्यालयात असताना दुसरीकडे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी ईडी कार्यालयाबाहेर जोरदार आंदोलन केले. राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे कार्याध्यक्ष सूरज चव्हाण यांच्या नेतृत्वात 20 ते 25 कार्याकर्त्यांनी सोमय्या यांच्याविरोधात जोरदार घोषणाबाजी केली. त्यानंतर पोलिसांनी या कार्यकर्त्यांना अटक केली.

    into the house of the Central Investigation Agency

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Gold : सोन्याने नवा विक्रम केला प्रस्थापित, पहिल्यांदाच किंमत ९७ हजारांच्या जवळ पोहोचली

    अविश्वास ठरावाला तोंड देण्यापूर्वीच कर्जत जामखेड मध्ये रोहित पवार समर्थक नगराध्यक्षांचा राजीनामा; रोहित पवारांनी नगरपंचायतीची गमावली सत्ता!!

    Thackeray brothers ठाकरे बंधूंच्या व्हॅलेंटाईन गुलाबाला लांब लांब काटे; दोघांच्या सैनिकांनी फोडले वेगवेगळे फाटे!!