प्रतिनिधी
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्यावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी अनेकदा निशाणा साधला आहे. पण आता पवारांचे नातू रोहित पवार संचालक राहिलेल्या एका कंपनीची चौकशी ईडीच्या टप्प्यात आली असताना पडळकरांनी संपूर्ण पवार कुटुंबीयांवर निशाणा साधला आहे. पवार कुटुंबीयांच्या रेशन कार्डवर नावे असलेल्या सर्वांची चौकशी व्हायवा हवी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. Interrogate everyone on Pawar family’s ration card
पवार संविधानापेक्षा मोठे नाहीत
पवार कुटुंबाच्या रेशन कार्डवर ज्या व्यक्ती आहेत त्या सर्वांची चौकशी झाली पाहिजे. ही चौकशी झाल्यानंतरच पवार कुटुंबीयांचा खरा चेहरा लोकांच्या समोर येईल. पवार हे संविधानापेक्षा मोठे नाहीत त्यामुळे आयकर विभाग, ईडी अशा सर्वच तपास यंत्रणांकडून त्यांची सखोल चौकशी करण्यात यावी, अशी मागणी पडळकरांनी केली आहे.
पवारांची भाजपवर टीका
रोहित पवार यांच्यावर होणा-या आरोपांबाबत शरद पवार यांनी भाजपला टोला लगावला आहे. रोहित पवार यांचे काय होणार,याची भविष्यवाणी भाजप नेत्यांनी आधीच केली आहे. या प्रकरणाची अजूनपर्यंत कोणतीही चौकशी झाली नाही. आपल्याला अधिकृत माहिती मिळाल्याचे भासवत त्याबाबत भाष्य करणारा एक वर्ग सध्या आपल्या महाराष्ट्रात निर्माण झाला आहे, असा टोला पवारांनी भाजप नेत्यांना लगावला आहे.
Interrogate everyone on Pawar family’s ration card
महत्वाच्या बातम्या
- मेट्रोसह इतर पायाभूत सुविधांची कामे युद्ध पातळीवर करा : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश
- सोनिया गांधींच्या PAवर बलात्काराचा आरोप : पीडिता म्हणाली- केस मागे घेण्यासाठी धमक्या मिळाल्या; तपास अधिकारीही बदलले
- विधिमंडळाच्या समोर पेटवून घेणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू, जमीन हडपल्याच्या वादातून केले होते आत्मदहन
- अलाहाबाद हायकोर्टाचे आदेश : मथुरेतील वादग्रस्त जागेच्या वैज्ञानिक सर्वेक्षणाचा मुद्दा 4 महिन्यात निकाली काढा!!