• Download App
    भोसरी येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र International Wrestling Training Center at Bhosari

    भोसरी येथे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र

    विशेष प्रतिनिधी

    पिंपरी चिंचवड : भोसरी गावजत्रा मैदाना शेजारी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या वतीने पै. मारुतराव रावजी लांडगे आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्र उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे देशातील दुसरे कुस्ती प्रशिक्षण केंद्र आहे. यापुर्वी पतियाळा येथे असे केंद्र उभारण्यात आले आहे. International Wrestling Training Center at Bhosari

    पिंपरी चिंचवड भाजपा शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे आणि आमदार लक्ष्मण जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली उभारण्यात आलेल्या या आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्रासाठी ८६०० चौरस मीटरच्या जागेत ५५११ चौरस मीटर बांधकाम करण्यात आले आहे. यामध्ये तळमजल्यावर पैलवानांसाठी, सरावासाठी हॉल, जीम, स्वच्छतागृह आणि ५०० व्यक्तींची व्यवस्था असणारे किचन, मेस, ५० व्यक्तींची निवास व्यवस्था होईल अशा आठ खोल्या बांधण्यात आल्या आहेत. तसेच पहिल्या मजल्यावर मुख्य हॉलमध्ये आर्कषक विद्युत रोषणाईसह १२x१२ मीटरच्या दोन मॅट, १२०० प्रेक्षकांना बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.



    आंतरराष्ट्रीय कुस्ती प्रशिक्षण केंद्राचे उद्‌घाटन नुकतेच विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पिंपरी चिंचवडच्या महापौर माई ढोरे होत्या. प्रमुख पाहुणे भाजपा शहर अध्यक्ष व आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, प्रथम महापौर व माजी आमदार ज्ञानेश्वर लांडगे, पिंपरी चिंचवड कुस्तीगीर संघाचे अध्यक्ष हनुमंत गावडे, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषदेचे सरचिटणीस बाळासाहेब लांडगे, स्थायी समिती अध्यक्ष ॲड. नितीन लांडगे, उपमहापौर हिरानानी घुले, माजी महापौर नितीन काळजे, राहुल जाधव, पक्षनेते नामदेव ढाके, ‘ई’ प्रभाग विभाग विकास डोळस, स्थानिक नगरसेवक संतोष लोंढे, सोनाली गव्हाणे, भिमाताई फुगे, महापालिका आयुक्त राजेश पाटील आदींसह नगरसेवक, नगरसेविका तसेच शहरातील कुस्ती शौकीन व वस्ताद उपस्थित होते.

    International Wrestling Training Center at Bhosari

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ‘ज्ञानपीठ’ आळंदी येथे उभारणार – देवेंद्र फडणवीस

    Tapti Mega Recharge : ताप्ती मेगा रिचार्ज प्रकल्पाबाबत महाराष्ट्र-मध्यप्रदेशात ऐतिहासिक करार!

    मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले- ठाकरे सरकार नसते तर दीड वर्षे आधीच मेट्रो आली असती; मुंबई मेट्रो लाईन-2 सेवेचा शुभारंभ