• Download App
    दुखद:भारताने आज गमावला तीसरा हिरा ! मराठमोळे अंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनाने निधन international bodybuilder jagdish lad dies due to covid-19

    दुखद:भारताने आज गमावला तीसरा हिरा ! मराठमोळे अंतरराष्ट्रीय बॉडीबिल्डर जगदीश लाड यांचे कोरोनाने निधन

    • मिस्टर इंडियाचा किताब जिंकणारे मराठमोळे बॉडीबिल्डर जगदीश लाड !

    • अद्यापही अनेकजण आपण एकदम ठणठणीत असून करोना होणार नाही अशा गैरसमजात आहेत.तुम्हालाही जर असंच वाटत असेल तर थांबा.कारण ही बातमी वाचून तुम्हीदेखील खडबडून जागे व्हाल.

    विशेष प्रतिनिधी

    बडोदा: करोनाच्या दुसऱ्या लाटेचा मोठा फटका भारताला बसला असून दैनंदिन रुग्णसंख्येसोबत मृतांची संख्याही उच्चांक गाठत आहे. आजच्या दिवसातील ही तीसरी दुखद बातमी आहे . बॉडीबिल्डिंगमधला सर्वोच्च किताब जिंकणारे मराठमोळे बॉडीबिल्डर जगदीश लाड (वय 34) यांचे कोरोनामुळे निधन झाले. international bodybuilder jagdish lad dies due to covid-19

    काही दिवसांपूर्वी त्यांना कोरोनाची बाधा झाली होती. उपचार सुरू असतानाच प्रकृती खालावल्याने त्यांनी बडोद्यात अखेरचा श्वास घेतला.

    त्यांच्या निधनाने बॉडीबिल्डींग विश्वाला मोठा धक्का बसला असून हळहळ व्यक्त केली जात आहे. त्यांच्या निधनानंतर महाराष्ट्र बॉडीबिल्डिंग असोशिएशन आणि मुंबई असोशिएशनने दुःख व्यक्त केले आहे.

    नवी मुंबईत राहणा-या जगदीश लाड यांनी गेल्यावर्षी बडोद्यात व्यायामशाळा उघडली होती. त्यामुळे जास्तीजास्त वेळ जगदीश बडोद्यात असायचे.

    मूळचा सांगली जिल्ह्यातील कुंडल गावचा असणारा जगदीश लाड हा नवी मुंबईत राहायचा. नंतर तो वडोदरा येथे स्थायिक झाला होता. तिथे त्याने स्वत:ची व्यायामशाळा सुरु केली होती.

    जगदीश लाडने नवी मुंबई महापौर श्रीचा किताब जिंकला होता. महाराष्ट्र श्रीमध्ये त्याला गोल्ड मेडल मिळालं होतं. मिस्टर इंडिया स्पर्धेतही जगदीश लाडने आपली छाप पाडत दोन वेळा गोल्ड मेडल जिंकलं होतं. दरम्यान वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये त्याने कांस्य पदक मिळवलं होतं.

    करोनाची लागण झाल्यानंत जगदीश लाड उपचारासाठी रुग्णालयात दाखल झाला होता. त्याला ऑक्सिजनवर ठेवण्यात आलं होतं. मात्र उपचारादरम्यानच त्याचं निधन झालं. अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये महाराष्ट्र आणि भारताचं प्रतिनिधित्व करणाऱ्या जगदीश लाडच्या निधनाने बॉडीबिल्डिंग क्षेत्राला मोठा धक्का बसला आहे.

    एक जंटलमन शरीरसौष्ठवपटू गमावला…

    जगदीश हा केवळ मेहनती खेळाडू नव्हता. तो एक सुसंस्कृत आणि सभ्य खेळाडू होता. त्याची पूर्ण कारकीर्द आव्हानं झेलण्यातच गेली. तो ज्या गटात खेळायचा, त्या गटातच स्पर्धेचा विजेताही असायचा. त्यामुळे त्याची गाठ नेहमीच दिग्गजांशीच पडायची. जगदीशही दिग्गजच होता. तो अनेकदा उपविजेता ठरला. कधी विजेताही ठरला. पण त्याने पंचांच्या निर्णयाबाबत अन्य खेळाडूंप्रमाणे कधीच वाद घातला नाही. कधीही संताप व्यक्त केला नाही. तो खऱ्या अर्थानं जंटलमन खेळाडू होता. त्याच्या निधनामुळे आम्ही एक विजेताच नव्हे एक प्रामाणिक खेळाडू गमावल्याची भावना जागतिक शरीरसौष्ठव संघटनेचे सरचिटणीस चेतन पाठारे यांनी व्यक्त केली.

    international bodybuilder jagdish lad dies due to covid-19

    Related posts

    Amit Shah : अमित शहांनी सांगितला आरोग्याचा मंत्र, म्हणाले- 2 तास व्यायाम, 6 तास झोप गरजेची; आज मी सर्व औषधांपासून मुक्त

    National Herald case : नॅशनल हेराल्ड प्रकरणी खरगे म्हणाले- आम्ही घाबरणार नाही; भाजपने म्हटले- कायदेशीर उत्तर द्या, राजकारण करू नका

    Central Goverment : परदेशात काम करण्यासाठी लवकर कायदा बनणार; उल्लंघनासाठी 10 वर्षांची शिक्षा शक्य