विशेष प्रतिनिधी
संगमनेर (अहमदनगर) : कोविड महामारीमध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका बजावणार्या आशा कर्मचाऱ्यांचे मानधन गेल्या सहा महिन्यापासून थकविण्यात आले आहे. आशा कर्मचाऱ्यांवरील या अन्यायाच्या विरोधामध्ये आज संपूर्ण महाराष्ट्रभर सिटू कामगार संघटनेच्या नेतृत्वाखाली आंदोलनाची हाक दिली होती. Intense protests by Asha employees !, no salary for six months ; Valuable help in covid pendamik
सिटूच्या या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आज अहमदनगर जिल्ह्यामध्ये विविध ठिकाणी सिटू कर्मचारी संघटनेच्या वतीने आशा कर्मचारी संपावर गेल्या. अकोले व संगमनेर तालुक्यामध्ये सिटू प्रणित आशा कर्मचारी संघटनेच्यावतीने आशा कर्मचाऱ्यांनी तीव्र निदर्शने करून आपला संताप व्यक्त केला. अकोले पंचायत समिती येथे शेकडो आशा कर्मचाऱ्यांनी मोर्चा काढत तीव्र निदर्शने केली.
अकोले येथील मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या कार्यालयांमध्ये मोठ्या संख्येने आशा कर्मचारी एकत्र आल्या. थकित मानधन तातडीने जमा करा, वाढीव मानधन आशा कर्मचाऱ्यांच्या खात्यावर वर्ग करा, वाढीव कामाचा बोजा देणे बंद करा या मागण्यांच्या घोषणा देत आशा कर्मचाऱ्यांनी अकोले शहराचा परिसर दणाणून सोडला.
Intense protests by Asha employees !, no salary for six months ; Valuable help in covid pendamik
महत्त्वाच्या बातम्या
- शिवजयंती उत्सवानिमित्त गर्दी नको
- देवेंद्र फडणवीस “मुख्यमंत्री”!!; चूक झाली “चुकून” की दत्तामामा मनातलं गेले बोलून??
- प्लास्टिक कप, प्लेट्स आणि स्ट्रॉजसारख्या वस्तूंच्या निर्मितीवर बंदी; १ जुलैपासून देशात अंमलबजावणी
- पश्चिम बंगालमध्ये हिजाबचे लोण; मुर्शिदाबादमध्ये शाळेच्या गणवेश नियमाला विद्यार्थिनींचा विरोध
- 12 ते 18 वयोगटातील मुलांसाठी नवीन लस कोर्बेवैक्स; लवकरच लसीकरणाचा निर्णय