• Download App
    हिंदू देवता, संतांचा अपमान आणि इस्लामची भलामण ही सुषमा अंधारेंची जुनी खोड; वाचा त्यांची वक्तव्ये Insulting Hindu Gods, Saints and glorifying Islam is an old trick of Sushma Andahar; Read their statements

    हिंदू देवता, संतांचा अपमान आणि इस्लामची भलामण ही सुषमा अंधारेंची जुनी खोड; वाचा त्यांची वक्तव्ये

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या सुषमा अंधारे यांच्याविरुद्ध महाराष्ट्रभर संताप उसळला आहे. वारकरी संप्रदाय आणि महानुभाव पंथ यांच्या अनुयायांनी सुषमा अंधारे ज्या पक्षात असतील, त्यांना त्या पक्षाला मतदान करणार नसल्याची प्रतिज्ञा केली आहे. Insulting Hindu Gods, Saints and glorifying Islam is an old trick of Sushma Andahar; Read their statements

    पण सुषमा अंधारे यांची वादग्रस्त वक्तव्ये त्या शिवसेनेत आल्यापासूनच आहेत, असे नाही तर वादग्रस्त वक्तव्ये करणे ही त्यांची जुनी खोड आहे. किंबहुना हिंदू देवदेवतांचा अपमान आणि इस्लामची भलामण करणे ही त्यांची जुनी खोड आहे.

    आत्तापर्यंत वेगवेगळ्या राजकीय आणि सामाजिक व्यासपीठांवरून सुषमा अंधारे आपण मोठ्या समाज सुधारक आहोत. घटनाकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या अनुयायी आहोत, असे ठसवताना ही घटना माझ्या बापाने लिहिली आहे, असे आक्रमताळे दावे केले. पण त्याचवेळी त्यांनी भगवान श्रीराम, श्रीकृष्ण, संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु संत तुकोबाराय, संत नामदेव महाराज, संत एकनाथ महाराज या संतांविषयी अपमानास्पद आणि संतापजनक उद्गार काढले आहेत.

    शारदीय नवरात्राची खिल्ली

    इतकेच नाही तर शारदीय देवी नवरात्रात देवी विषयी देखील त्यांनी अपमानास्पद उद्गार काढले होते. एका व्यासपीठावरून बोलताना सुषमा अंधारे म्हणाल्या होत्या, महिला नवरात्रात चपला घालत नाहीत, ही अजब प्रथा आहे. त्यांना विचारले, का गं चपला घालत नाहीस? तर म्हणते आई बसली!! बर ती बसली तर बसली… पण मग तू बस… तेव्हा सुद्धा महिला म्हणतात, आम्ही कसं बसणार??, आई बसली!!, नवरात्र बसवण्याची सुषमा अंधारे यांनी या शब्दांमध्ये खिल्ली उडवली होती.

     श्रीरामावर आक्षेप

    इतकेच नाही तर जो श्रीराम आपल्या बायकोला सात महिन्यांची गर्भवती असताना जंगलात सोडतो, तो श्रीराम कसला आमचा देव?, असा अपमानास्पद सवाल सुषमा अंधारे यांनी केला होता. भगवान श्रीकृष्णाचाही त्यांनी असाच अपमान केला होता.



     संत ज्ञानेश्वरांचा अपमान

    संत ज्ञानेश्वरांनी रेड्याच्या मुखी वेद वदलले. पण या गोष्टीची देखील सुषमा अंधारे यांनी खिल्ली उडवली होती. त्यांनी म्हणे रेड्या तोंडी वेद वदवले… तुम्ही रेड्याला शिकवले हो… पण माणसांना कुठे शिकवले??, असा संताप आणणारा सवाल सुषमा अंधारे यांनी केला होता.

    संत नामदेवांच्या विठ्ठल भक्तीची खिल्ली

    त्याचबरोबर संत नामदेवांची कथा त्यांनी संत एकनाथांची म्हणून खपवली होती. संत नामदेव महाराजांची विठ्ठल भक्तीची खिल्ली उडवताना नामदेव महाराज तुपाची वाटी घेऊन कुत्र्यामागे कसे धावले याचे खिल्ली उडवणारे वर्णन सुषमा अंधारे यांनी केले होते. तुम्ही कुत्र्यामागे पळालात. पण माणसांना खाऊ घातले नाही, असा खळबळ जनक आरोप त्यांनी केला होता.

    सुषमा अंधारे यांची ही सगळी संतापजनक वक्तव्ये व्हिडिओ रूपात सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत. सुषमा अंधारे यांनी केलेला संतांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. त्या ज्या पक्षात असतील त्या पक्षाला मत देणार नाही, अशा प्रतिज्ञाच वारकऱ्यांनी आणि महानुभाव पंथीयांनी केली आहे.

    इस्लामची भलामण

    खोट्या कथांच्या आधारे हिंदू देवदेवतांचा बिनदिक्कतपणे अपमान करणाऱ्या सुषमा अंधारे जाहीर सभांमध्ये इस्लामची मात्र भलामण करताना दिसतात. त्यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रबोधन मेळाव्यात इस्लामची पाच तत्वे सांगताना मोठमोठ्याने ला इलाहा इल्लिल्ला अशी प्रार्थना म्हटली होती. इस्लाम मध्ये त्यांना समतेचे तत्त्व दिसले, पण हिंदू देवदेवतांची मात्र त्यांनी खिल्ली उडवताना विषमता दिसते. सुषमा अंधारे यांच्या या दुटप्पी भूमिकेविरुद्ध संपूर्ण महाराष्ट्रात प्रचंड संताप आहे.

    Insulting Hindu Gods, Saints and glorifying Islam is an old trick of Sushma Andahar; Read their statements

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    नवीन प्रणालीद्वारे होणार सार्वजनिक तक्रारींचे निवारण

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल