• Download App
    Koradi Thermal Power Project ‘’कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प लवकरात लवकर सुरू करा’’ ; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश!

    Koradi ‘’कोराडी औष्णिक विद्युत प्रकल्प लवकरात लवकर सुरू करा’’ ; मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश!

    कोराडी विद्युत प्रकल्पासाठी वेस्टर्न कोल इंडियाचा कोळसा वापरावा, असंही फडणवीसांनी म्हटलं आहे.

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली विधान भवन, मुंबई येथे कोराडी ऊर्जा प्रकल्पासंदर्भात बैठक पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोराडी येथील 2×660 मेगावॅट क्षमतेच्या औष्णिक विद्युत निर्मिती केंद्र प्रकल्पात सुपर क्रिटिकल टेक्नॉलॉजीचा वापर करावा आणि हा प्रकल्प जास्तीत जास्त क्षमतेने लवकरात लवकर सुरू करण्याचे निर्देश दिले.

    मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुढे म्हणाले, कोराडी विद्युत प्रकल्पासाठी वेस्टर्न कोल इंडियाचा कोळसा वापरावा. जास्तीत जास्त क्षमतेने हा प्रकल्प चालविताना कमीत कमी प्रदूषण होईल याकडे लक्ष द्यावे. संपूर्ण प्रकल्प पर्यावरणपूरक करण्यावर भर द्यावा.



    गारेपालमा येथील कोळशाच्या वापरासाठी त्याच्या जवळच आणखी एक विद्युत प्रकल्प उभारावा, असे निर्देशही त्यांनी दिले. या प्रकल्पातून उत्पादित होणारी वीज कमीत कमी दरात मिळेल. तसेच, या प्रकल्पासाठी सांडपाण्यावर प्रक्रिया करून ते पाणी वापरण्यात येईल, त्यामुळे पाण्याचा प्रश्न उद्भवणार नाही, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी स्पष्ट केले.

    या बैठकीला मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री अतुल सावे, मंत्री जयकुमार रावल, राज्यमंत्री मेघना बोर्डीकर, महावितरणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महापारेषणचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, महानिर्मितीचे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, विविध विभागांचे सचिव आणि इतर अधिकारी उपस्थित होते.

    Instructions to start Koradi Thermal Power Project as soon as possible

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    प्रकाश आंबेडकर यांच्या वंचित आघाडीची दुहेरी खेळी; मुंबईत काँग्रेस बरोबर युती, पण उल्हासनगर मध्ये शिंदे सेनेबरोबर आघाडी; भाजपवर मात!!

    Sonam Wangchuk : वांगचुक यांच्या पत्नी म्हणाल्या- सोनम तुरुंगात जमिनीवर झोपत आहेत, बॅरेकमध्ये फिरण्यासाठीही जागा नाही, त्यांच्या केसमध्ये दम नाही

    Kishtwar : जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी चकमकीत 7 जवान जखमी; 3 जणांना एअरलिफ्ट केले; किश्तवाडच्या सोनारमध्ये ऑपरेशन त्राशी-1 सुरू