विशेष प्रतिनिधी
सावरगाव बीड : दसऱ्याच्या निमित्ताने भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी भगवानगडावर आयोजित केल्या गेलेल्या मेळाव्यामध्ये आज उपस्थिती दर्शविली होती. यावेळी त्यांनी बऱ्याच मुद्द्यां वरून सरकारला टार्गेट केले आहे. अतिवृष्टीमुळे झालेल्या शेतकऱ्यांच्या नुकसानभरपाईचा मुद्दा, कोरोना काळात झालेल्या नुकसानीचा मुद्दा, महाराष्ट्र राज्यातील तसेच देशातील स्त्रियांच्या सुरक्षिततेचा मुद्दा, उसतोड महामंडळाचा मुद्दा, त्याचप्रमाणे मराठा आरक्षण, ओबीसी आरक्षण यांच्याबद्दलही त्यांनी बऱ्याच गोष्टीवर वक्तव्य केले आहे.
Instead of trying to please each other, the three parties in the Mahavikas Aghadi should work in the interest of the people : Pankaja Munde
आरक्षणा बद्दल बोलताना पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या की, मराठा समाजाला शैक्षणिक क्षेत्रामध्ये आरक्षण हवे आहे तर ओबीसी समाजाला राजकीय क्षेत्रामध्ये आरक्षण हवे आहे. मराठा आणि ओबीसी गटांमध्ये भांडणे लावण्याचा प्रयत्न केला जात आहे. हे दोन्ही वेगळे नसून एकच बहुजन समाज आहे असे देखील यावेळी त्या म्हणाल्या.
पंकजा मुंडे यांनी लुटला दांडियाचा आनंद; परळीत कार्यकर्त्यांचा आग्रह मोडता आला नाही
पुढे त्या म्हणाल्या की, मराठा आणि ओबीसी समाजासाठी नक्की आवाज उठवला जाईल. मी मराठा समाजाला आरक्षण मिळेपर्यंत गळ्यामध्ये हार घालणार नाही अशी शपथ घेतली आहे. आणि ओबीसीला राजकीय आरक्षण मिळेपर्यंत डोक्याला फेटा बांधणार नाही अशीदेखील शपथ घेतली आहे. महाराष्ट्रच्या कानाकोपऱ्यात जाऊन वंचितांसाठी काम करणार.
प्रार्थनालये, रूग्णालय, सार्वजनिक ठिकाणी स्वच्छ ठेवली जात नाही. हा स्वच्छतेचा मुद्दा यावेळी त्यांनी मांडला. आपल्या गावातील प्रार्थनास्थळे स्वच्छ ठेवण्याची जबाबदारी गोपीनाथ मुंडे प्रतिष्ठानकडून तुम्ही घेणार का? हा प्रश्न त्यांनी लोकांना यावेळी विचारला.
महाविकास आघाडीवर टीका करताना त्या म्हणाल्या की, एकाचवेळी तीन पक्ष एकत्र असल्यामुळे एकमेकांना खूश करण्याच्या नादामध्ये जनतेचे नुकसान होत आहे. जनतेच्या हिताकडे लक्ष केंद्रित करा असे त्यांनी सरकारला त्यावेळी सांगितलं आहे. त्याच बरोबर त्या असंही म्हणाल्या की, बाळासाहेब ठाकरेंच्या प्रतिमेला साजेसे काम सरकारकडून व्हावे ही अपेक्षा.
Instead of trying to please each other, the three parties in the Mahavikas Aghadi should work in the interest of the people : Pankaja Munde
महत्त्वाच्या बातम्या
- संभाजी भिडेंच वादग्रस्त वक्तव्य ; म्हणाले – निर्लज्ज लोकांचा देश म्हणजे हिंदुस्थान
- भारताच्या संरक्षणाची “सप्तशक्ती”; 7 नव्या कंपन्या ठरतील भारताच्या सैन्यशक्तीचा मजबूत पाया
- Inflation : खाद्यतेलांवरील आयात शुल्क रद्द केल्यानंतर केंद्राचे 8 राज्यांना पत्र, महागाई नियंत्रित करण्यासाठी कठोर पावले उचलण्याचे आवाहन
- Elgaar Parishad case : वरवरा राव यांना 28 ऑक्टोबरपर्यंत सरेंडर करण्याची गरज नाही – मुंबई उच्च न्यायालय