विशेष प्रतिनिधी
सातारा : सातारा पालिकेने अजिंक्यतारा किल्ल्याच्या दरड कोसळणाऱ्या भागाची केली पाहणी केली असून नागरिकांना दिला सतर्कतेचा इशारा दिला आहे. तसेच धोकादायक भागातील नागरिकांनी पर्यायी व्यवस्था करून घ्यावी, अशी सूचना सुद्धा केली आहे. Inspection of the Dangerous Area of Ajinkyatara fort by the municipality; Instructions to residents to be vigilant
सातारा जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत जोरदार पावसाने डोंगरकडा कोसळून अनेक दुर्घटना झाल्या आहेत. अनेकांना आपला जीव गमवावा लागला. सातारा शहरानजीक असलेल्या अजिंक्यतारा किल्ल्याचा काही भाग 2017 मध्ये कोसळून अनेकांच्या घराचे नुकसान झाले होते. पाटण,वाई येथील घटनेच्या पार्श्वभूमीवर सातारा पालिकेकडून खबरदारी घेत किल्ला परिसरात राहणाऱ्या नागरिकांना इशारा दिला. यावेळी माचीपेठ, बोगदा, चारभिंत, पावर हाऊस येथे जाऊन पालिकेचे मुख्याधिकारी अभिजित बापट,उपनगराध्यक्ष मनोज शेंडे आणि बांधकाम अभियंता छिद्रे यांनी पाहणी केली.
- अजिंक्यताराच्या धोकादायक भागाची पाहणी
- माचीपेठ, बोगदा, चारभिंत, पावर हाऊसचा समावेश
- दरड कोसळण्याचा नागरिकांना दिला इशारा
- 2017 मध्ये कोसळून घरांचे नुकसान झाले होते
- पुनरावृत्ती टाळण्यासाठी नागरिकांना केले सावध
- नागरिकांनी पर्यायी व्यवस्था करण्याच्या सूचना
Inspection of the Dangerous Area of Ajinkyatara fort by the municipality; Instructions to residents to be vigilant
महत्त्वाच्या बातम्या
- लस घेणाऱ्या नागरिकांना रोख डॉलर्स तर कुठे चक्क मोटार किंवा गायीचे बक्षीस
- लोकवर्गणीतून १६ कोटी रुपये जमवून इंजेक्शन दिलेली चिमुकल्या वेदीकाचा मृत्यू
- सत्तेवर असताना काँग्रेस होती हेरगिरीतील जेम्स बॉँड, पेगासिस स्पायवेअर प्रकरणा मुख्तार अब्बास नक्वी यांचा पलटवार
- पुरग्रस्त भागासाठी देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना लिहिले पत्र, मोबाईलवर काढलेले फोटोही पंचनामे म्हणून ग्राह्य धरा