• Download App
    यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची चौकशी सुरु; कारवाईसंबंधी विधानसभेत चर्चा । Inquiry of Babaji Date Mahila Sahakari Bank of Yavatmal Start; Action in the Legislative Assembly

    यवतमाळच्या बाबाजी दाते महिला सहकारी बँकेची चौकशी सुरु; कारवाईसंबंधी विधानसभेत चर्चा

    विशेष प्रतिनिधी

    मुंबई : यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेबाबत अनेक तक्रारी प्राप्त झाल्या असून या बँकेच्या अनियमिततेच्या कारभाराची चौकशी सुरू असून लवकरच अहवाल प्राप्त होईल. यवतमाळ येथील बाबाजी दाते महिला सहकारी बँकेवर कारवाईसंबंधी विधानसभा सदस्य नाना पटोले यांनी लक्षवेधी सूचना सभागृहात मांडली. या चर्चेत विधानसभा सदस्य सुभाष देशमुख,मदन येरावार, प्रकाश सोळंके यांनी भाग घेतला. Inquiry of Babaji Date Mahila Sahakari Bank of Yavatmal Start; Action in the Legislative Assembly



    बाबाजी दाते महिला सहकारी बँक यवतमाळ ही बँक नोंदणीकृत सहकारी बँक असून या बँकेत ५३६.३१ कोटी रूपयांच्या ठेवी असून बँकेमार्फत ३३६.५२ कोटी रूपयांचे कर्ज वाटप करण्यात आले आहे.बँकेचा संचित तोटा १०८.६० कोटी रुपयेइतका आहे. या बँकेत बऱ्याच प्रकरणात अनियमितता आढळून आल्याबद्दल याची चौकशी सुरू आहे.

    अनियमित कर्ज वाटप, कर्ज वसुलीसाठी ठोस कारवाई न करणे, चुकीच्या पद्धतीने ओ.टी.एस.योजना राबविणे आदी मुद्दयांचा त्यामध्ये समावेश आहे या चौकशी समितीचा अहवाल लवकरच प्राप्त होईल अशी माहिती सहकारमंत्री बाळासाहेब पाटील यांनी विधानसभेत दिली.

    Inquiry of Babaji Date Mahila Sahakari Bank of Yavatmal Start; Action in the Legislative Assembly

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    सुधाकर बडगुजर यांची भाजपमध्ये संभाव्य एन्ट्री, पुढच्या राजकारणातला धोका ओळखून आमदार सीमा हिरे यांचा विरोध; पण निर्णय काय होणार??

    Girish Mahajan : तुमच्याकडच्या लग्नामध्ये कोण कोण नाचले विचारले तर काय होईल? गिरीश महाजन यांचा संजय राऊतांवर पलटवार

    Devendra Fadanvis : घराचे स्वप्न आता वास्तवात; महाराष्ट्राची बेघरमुक्तीकडे दमदार वाटचाल; ग्रामीण भागातील घरांसाठी 80000 कोटींची गुंतवणूक!!