• Download App
    महायुतीतल्या तिन्ही पक्षांवर अन्याय होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचे अजितदादांसमोर गोड शब्दांत परखड बोल!!|Injustice will not be allowed to the three parties in the Grand Alliance; The Chief Minister's speech in front of Ajit Dada in sweet words!!

    महायुतीतल्या तिन्ही पक्षांवर अन्याय होऊ देणार नाही; मुख्यमंत्र्यांचे अजितदादांसमोर गोड शब्दांत परखड बोल!!

    प्रतिनिधी

    नाशिक : अजित पवारांना सर्वजण दबंग म्हणतात. ते कडक असून, रेटून नेतात असा दावा करतात. पण तसे नाही. ते सर्वांना सोबत घेऊन चालणारे नेते आहेत. आमच्या तिन्ही पक्षांच्या आमदारांवर अन्याय होणार नाही याची काळजी ते घेतील, अशा शब्दांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्री अर्थमंत्री अजित पवार यांना गोड शब्दांत परखड बोल ऐकवले.Injustice will not be allowed to the three parties in the Grand Alliance; The Chief Minister’s speech in front of Ajit Dada in sweet words!!

    अजित पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये बंडखोरी करत शिंदे – फडणवीस सरकारमध्ये सहभागी झाले. त्यानंतर अर्थखातेही त्यांना देण्यात आले. तत्पूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी त्यांना अर्थमंत्रीपद देण्यास ठाम विरोध केल्याच्या बातम्या आल्या. पण आता चित्र बदलले आहे. नाशिक येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात शिंदे यांनी अजित पवारांना गोड शब्दांत कोणावरही अन्याय करू नका, असे सुनावले आहे.



    एकनाथ शिंदे म्हणाले, अजित पवारांनी मला सांगितले आहे की, सर्वजण त्यांना दबंग म्हणतात. ते कडक असल्याचे बोलतात. ते रेटून नेतात, अशी टीकाही करतात. पण प्रत्यक्षात तसे नाही. अजित पवार सर्वांना सोबत घेऊन चालणारे आहेत. आमच्या तिन्ही पक्षांच्या आमदारांवर अन्याय होणार नाही याची काळजी ते घेतील, असे एकनाथ शिंदे म्हणाले.

    सापत्न वागणूक नाही

    महाराष्ट्राचा मुख्यमंत्री म्हणून मी माझ्या दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना विश्वासात घेऊन आमच्या 200 हून अधिक आमदारांपैकी एकावरही अन्याय होऊ देणार नाही. माझ्या नेतृत्वात कुणालाही सापत्न वागणून मिळणार नाही. सर्वांना समान न्याय देण्याचे काम माझे सरकार करेल, असेही शिंदे यावळी म्हणाले.

    विरोधकांची वज्रमुठ वज्रझूठ ठरली

    एकनाथ शिंदे यांनी यावेळी विरोधी पक्षांवरही निशाणा साधला. विरोधी पक्ष वज्रमुठ बांधत होते. पण त्यांची वज्रमुठ तर वज्रझुठ ठरली. तसेच या देशाची मोट बांधायला निघालेल्यांची स्वतःचीच बोटेही फुटून गेली. त्यांच्याकडे आता काहीच उरले नाही. त्यामुळेच ते सर्वजण पंतप्रधान मोदींच्या विरोधात एकत्र आले. पण अद्याप त्यांना आपला चेहरा ठरवता आला नाही. यामुळे निवडणुकीअगोदरच मोदींचा विजय निश्चित झाला आहे, असे शिंदे म्हणाले.

    नरेंद्र मोदींवर यापूर्वी अनेक आरोप झाले. त्यांच्याविरोधात आघाड्या झाल्या. पण त्यांनी जेवढे आरोप केले, तेवढ्या त्यांच्या जागा कमी झाल्या. 2019 च्या निवडणुकीत तर त्यांना विरोधी पक्षनेतेपदासाठी आवश्यक असणारे संख्याबळ मिळवता आले नाही, असेही शिंदे म्हणाले.

    Injustice will not be allowed to the three parties in the Grand Alliance; The Chief Minister’s speech in front of Ajit Dada in sweet words!!

    महत्वाच्या बातम्या 

     

    Related posts

    ठाकरे बंधू एकत्र; पवार + काँग्रेस अस्वस्थ!!

    Mangeshkar Hospital : मंगेशकर रुग्णालय वाद : ईश्वरी भिसे मृत्युप्रकरणी डॉ. घैसासांवर हलगर्जीपणाचा गुन्हा दाखल

    Chief Minister Fadnavis : शेवटच्या माणसापर्यंत दर्जेदार, सुलभ, किफायतशीर आरोग्य सेवेचे ध्येय – मुख्यमंत्री फडणवीस