विशेष प्रतिनिधी
बारामती : सुप्रिया सुळे विरुद्ध सुनेत्रा पवार अशा लढतीची शक्यता लक्षात घेऊन शरद पवारांनी अजित पवारांचे सख्खे भाऊ श्रीनिवास पवार यांना आपल्या गोटात खेचले. त्यानंतर श्रीनिवास पवारांनी थेट अजित पवारांना “नालायक” ठरविले. दोन दिवस या विषयावर बारामतीत तुफानी चर्चा चालली, पण आज मात्र अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी शरद पवारांच्या कार्यकर्त्यांवर कुरघोडी केली. शरदचंद्र पवार गटाचे नेते युगेंद्र पवार यांना अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी घेरले. त्यांना श्रीनिवास पवार यांच्या वक्तव्याबद्दल जाब विचारला. शरदचंद्र पवार गटाच्या कार्यकर्ते सोशल मीडियावर खालच्या पातळीवर टीका करतात. त्यांना आवर घाला, असा इशारा कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना दिला.Initially the movement of the Pawar group, now the agitation of Ajitdad’s workers; Surround Yugendra Pawar!!
युगेंद्र पवार हे सध्या बारामती तालुक्यात गाव भेट दौऱ्याच्या निमित्ताने कार्यकर्त्यांशी संवाद साधला. श्रीनिवास पवार यांनी अजित पवारांवर “नालायक” तिखट टीका केली होती. शरद पवारांच्या कार्यकर्त्यांनी त्या वक्तव्याचा व्हिडिओ बनवून व्हायरल केला. त्यातली काही ठराविक वाक्यांची रिल्स बनवून तीच वारंवार ऐकवली. त्यामुळे अजित पवारांचे कार्यकर्ते संतापले आणि त्यांनी युगेंद्र पवारांना घेराव घातला.
आम्ही पवार कुटुंबावर कायम प्रेम करतो. पण अजित पवार यांच्याबद्दल श्रीनिवास पवार बोलले तो व्हिडीओ एडीट करून तो जाणूनबुजून व्हायरल केला जात असल्याचे या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना सुनावले. त्यांनी ते ऐकून घेतले. यावेळी शरदचंद्र पवार गटाच्या अन्य पदाधिकाऱ्यांनी काही चुका होत असतील तर त्या दुरुस्त केल्या जातील, असे आश्वासन दिले. त्यानंतर युगेंद्र पवार पुढील दौऱ्यासाठी रवाना झाले.
ज्या शरद पवार साहेबांनी 26 वर्षे दादांना मंत्री केले, चार वेळा उपमुख्यमंत्री केले. तरीसुद्धा काकांनी माझ्यासाठी काय केले असे म्हणायचे! असा काका मला असता तर, मी खुश झालो असतो.. असे म्हणत अजित पवार यांचे सख्खे बंधू श्रीनिवास पवार यांनी त्यांच्यावर तोफ डागली होती. मला काही व्यक्ती म्हणाल्या इथून पुढची वर्ष दादांची आहेत, साहेबांची नाही. हा विचार मला वेदना देऊन गेला. पुढच्या काही वर्षात दुसऱ्या व्यक्तीकडून आपल्याला लाभ मिळणार आहे. म्हणून वय झालेल्या व्यक्तीची आपण किंमत करत नाही. यासारखा नालायक माणूस नाही, अशा जळजळीत शब्दांत श्रीनिवास पवार यांनी टीका केली होती. त्यामुळे संताप अजितदादांच्या कार्यकर्त्यांनी युगेंद्र पवारांना घेराव घालून त्याचा जाब विचारला.
Initially the movement of the Pawar group, now the agitation of Ajitdad’s workers; Surround Yugendra Pawar!!
महत्वाच्या बातम्या
- उत्तर प्रदेशातील बदायूँ मध्ये 2 लहान मुलांची वस्तऱ्याने गळे चिरून हत्या; आरोपी साजिदचा पोलिसांकडून एन्काऊंटर!!
- पहिली ‘मेड-इन-इंडिया’ चिप डिसेंबर 2024 पर्यंत येणार; आयटी मंत्री म्हणाले- 2029 पर्यंत भारत जगातील टॉप-5 चिप इकोसिस्टिमचा भाग असेल
- कर निर्धारणप्रकरणी काँग्रेसच्या याचिकेवर आज सुनावणी; दिल्ली हायकोर्टाने दंडाला स्थगितीची याचिका फेटाळली होती.
- गडचिरोलीत 36 लाखांच्या इनामी 4 नक्षलींना कंठस्नान; तेलंगण सीमेवर एन्काउंटर