प्रतिनिधी
नंदूरबार : डाकीण असल्याच्या अंधश्रद्धेतून एका महिलेला विवस्त्र करुन छळ केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. नंदुरबारमध्ये सोशल मीडियावरून संबंधित महिलेचे व्हिडीओ व्हायल झाल्यानंतर पोलीसांनी दखल घेत गुन्हा नोंदवला आहे. ही नेमकी घटना कुठली आहे, याचा तपास पोलीस करत आहेत. पण बोली भाषेवरुन घटना सातपुडा पर्वत रांगामधील असल्याची शक्याता वर्तवली जात आहे. याबाबत अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देत घटनेची पडताळणी करण्याची मागणी केली आहे.Inhuman beatings by stripping and stripping a woman out of superstition – torture; Police continue investigation
ही घटना कुठली आणि संबंधीत पीडित महिला कोण याबाबत पोलीस देखील तपास करत आहेत. याबद्दल राज्य आणि केंद्रीय महिला आयोगाकडे याबाबत तक्रार करणार सल्याचे अंधश्रद्धा निर्मूलन समितीने स्पष्ट केले आहे. नंदुरबारमध्ये डाकीण प्रथेबाबत अनेक अंधश्रद्धा आहेत आणि त्यातुनच या महिलेसोबत हा दुर्दैवी प्रकार झाल्याची चर्चा आहे.
गेल्या आठवड्यापासून एका महिलेचा सोशल मीडियावरती व्हिडीओ व्हायरल होत आहे. त्या व्हिडीओला विवस्त्र करण्यात आले आहे. आसपासची लोकं तिला चटके देण्याचा प्रयत्न करीत आहेत. तिला विचारत आहेत की, तू डाकीण आहेस आणि कोणाकोणाला खाल्ले आहेस. हा भयानक व्हिडीओ आहे, असे आत्तापर्यंत तीन व्हिडीओ व्हायरल झाले आहेत.
फुले शाहू आंबेडकर यांचा वारसा सांगणाऱ्या पुरोगामी महाराष्ट्राचे घडत आहे. महाराष्ट्र अंधश्रध्दा निर्मूलन समिती याचा तीव्र निषेध करते. पोलिस प्रशासनाने याचा छडा लावला पाहिजे. काल आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन दिलं आहे अशी माहिती अंधश्रध्दा निर्मुलन समितीचे सरचिटणीस विनायक साळवे यांनी दिली आहे.
पोलिस कसून चौकशी करीत आहेत
मागील दोन ते तीन दिवसांपासून एका महिलेचा विवस्त्र अवस्थेतील व्हिडीओ व्हायरल होत आहे. स्थानिक बोली भाषेमध्ये तिला काही प्रश्न विचारले जात आहे. तर त्या अनुशंगाने तिला डाकीण संबोधन्याचा हा प्रकार दिसून येतो. हा प्रकार नेमका कुठला आहे, त्याबाबत पोलिस तपास करीत आहेत. गावातल्या खबऱ्यामार्फत आम्ही चौकशी करीत आहोत. दोषी असलेल्या आरोपींवरती कठोर कारवाई करण्यात येईल, असे नंदूरबार पोलिसांनी स्पष्ट केले आहे.
Inhuman beatings by stripping and stripping a woman out of superstition – torture; Police continue investigation
महत्त्वाच्या बातम्या
- लखीमपूर खेरी हिंसाचार प्रकरणातील आशिष मिश्रा यांचा जमीन फेटाळला
- प्रीतम मुंडेंकडून केंद्र सरकार बरोबरच राज्य सरकारचे कौतुक!!; मराठी माध्यमांच्या मात्र राज्य सरकारच्या कौतुकाच्या बातम्या!!
- Nawab Malik ED : नवाब मलिकांना पुन्हा दणका; कोठडीतला मुक्काम 22 एप्रिल पर्यंत वाढला!!
- नाशिक मध्ये हनुमान चालिसावर निर्बंध