पत्नीला मारहाण करतानाचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर आळंदीला पळून गेलेल्या गजानन बुवा चिकणकरला कल्याण पोलिसांनी अटक केली आहे. Inhuman beating of elderly wife; Gajanan Buwa Chikankar, who left for Alandi as soon as the video went vira
विशेष प्रतिनिधी
मुंबई : आपल्या वृद्ध पत्नीला मारहाण करणाऱ्या वृद्ध किर्तनकार गजानन बुवा चिकणकरला हिललाईन पोलिसांनी अखेरीस अटक केली आहे. सोशल मीडियावर आपल्या पत्नीला बादलीने आणि हाताने अमानुषपणे मारहाणा करतानाचा गजानन बुवा चिकणकर यांचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. यानंतर चिकणकरवर कारवाई करण्यात यावी यासाठी मोठ्या प्रमाणात मागणी होत होती.
- WATCH : कीर्तनकाराची वयोवृद्ध पत्नीला अमानुष मारहाण, व्हिडिओ व्हायरल होताच महाराज आळंदीला गेले निघून
समाजमाध्यमांमध्ये या प्रकरणावरुन संतप्त प्रतिक्रीया उमटल्यानंतर कल्याण पोलिसांनी स्वतःहून पुढाकार घेत याविरोधात तक्रार दाखल करुन घेतली. पत्नीला मारहाण केल्यानंतर चिकणकर आळंदीला वारीसाठी गेल्याचं पोलिसांना समजलं. यानंतर पोलिसांनी एक पथक तात्काळ आळंदीला रवाना करत या बुवाला बेड्या ठोकल्या आहेत.
काय आहे नेमकं प्रकरण?
घरात पाण्यावरुन झालेल्या वादानंतर ८५ वर्षीय गजानन बुवा चिकणकरने आपल्या पत्नीला मारहाण केली. ३१ मे रोजी घडलेल्या या घटनेचा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. गजानन बुवाच्या १३ वर्षीय नातवाने हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल केला. महत्वाची गोष्ट म्हणजे या व्हिडीओत गजानन बुवा आपल्या पत्नीला मारहाण करत असताना घरातला एकही सदस्य त्याला थांबवण्यासाठी पुढे आला नाही. यानंतरही पत्नीने तक्रार देण्यास नकार दर्शवला. पोलिसांनी स्वतःहून तक्रार दाखल करत गजानन बुवा चिकणकरला आळंदीतून अटक केली आहे.
Inhuman beating of elderly wife; Gajanan Buwa Chikankar, who left for Alandi as soon as the video went viral
महत्त्वाच्या बातम्या
- वादग्रस्त पोस्टनंतर भज्जीने मागितली माफी, म्हणाला- मी एक शीख आहे, जो कायम भारतासाठी लढेल, भारताविरुद्ध नाही!
- ओबीसी आरक्षणाचा मुद्दा तापला, छगन भुजबळांचा फडणवीसांना फोन, म्हणाले- आम्ही अडचणीत, मदत करा!
- या 9 राज्यांनी केंद्राने दिलेल्या लसींचा पूर्ण वापर केला नाही, यामुळेच मंदावली लसीकरणाची गती
- विरोधकांच्या कोलांटउड्यांमुळे पुन्हा केंद्राकडेच लसीकरणाची कमान, पीएम मोदींच्या निर्णयामागील महत्त्वाचे मुद्दे
- Modi Speech : राज्ये अपयशी ठरल्याने केंद्रानेच घेतली पुन्हा जबाबदारी; आता २१ जूनपासून १८ वर्षांवरील सर्वांनाच मोफत लस