वृत्तसंस्था
मुंबई : कोरोनामुळे त्रस्त असलेल्या जनतेला महागाईचे चटके बसत आहेत. पेट्रोल डिझेलच्या दरामध्ये वाढ होत असल्यामुळे महागाई भडकत चालली आहे. त्यातच जीवनावश्यक वस्तूंचे भावही गगनाला भिडले आहेत. वर्षाभरात खाद्यतेलांच्या दरात ५० टक्के तर किराणा वस्तूंच्या दरात ४० टक्के वाढ झाली आहे. Inflation High in Corona period; 40 per cent increase in groceries and 50 per cent increase in edible oil
दररोज गरज भासणाऱ्या वस्तू म्हणजे फास्ट मूव्हिंग कंज्यूमर गुड्सच्या (एफएमसीजी) दरात वर्षभरात 20 टक्क्यांची वाढ झाली. या सर्वात कहर म्हणजे खाद्यतेलाच्या किंमतीत प्रचंड वाढ झाली. त्यामुळे सर्वामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. खाद्यतेलांचे दर दीडपटीने वाढले आहेत. गेल्यावर्षी एप्रिलमध्ये मोहरी तेलाचे पॅकेट 135 रुपयांना होते. त्याचे दर आता 185 रुपये झाले आहे. त्याचप्रमाणे सर्व ब्रँडेड खाद्यतेलाचे दरही वाढले आहेत.
कोरोनात तांदूळ, डाळ आणि साखर यांचे दरही वाढले आहेत. गेल्यावर्षी 81 रुपये किलो दराने तूरडाळ मिळत होती. आता ती 107 रुपये किलो झाली आहे. चहाच्या पावडरचेही दर 15 ते 20 टक्क्यांनी वाढले आहेत.
तांदळाचे दर 15 टक्के, डिटर्जंट पावडरचे दर 10 टक्के, फ्लोअर क्लिनरचे दर 5 टक्के, साखरेचे दर 5 टक्के वाढले आहेत. तर खाद्यतेलात सर्वाधिक म्हणजे 50 टक्क्यांची वाढ झाली आहे. साबण आणि डिटर्जंटच्या किंमतीतही वाढ झाल्याने सामान्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. दर वाढल्यावर ग्राहकांनी पाठ फिरवू नये, म्हणून काही कंपन्यांनी दरवाढ केलेली नाही. मात्र, त्यांनी वस्तूंचे वजन कमी केले आहे. काही पॅकेटमध्ये 10 ते 15 ग्रॅमने घट केली आहे.
Inflation High in Corona period; 40 per cent increase in groceries and 50 per cent increase in edible oil
महत्त्वाच्या बातम्या
- ‘आरटीओ’मध्ये चालकाला आता वाहन चाचणी न देताच मिळणार ‘लायसन्स’
- सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये कोरोना रुग्ण अधिक
- तिशीतील तरुणांचा कर्ज घेण्याकडे अधिक कल; सर्वेक्षणातून स्पष्ट
- Positive news : काश्मीरमधले १००० शेतकरी रमले सुगंधी लव्हेंडर शेतीत; केंद्राच्या अरोमा मिशनने आणले जीवनात आणले मोठे परिवर्तन