• Download App
    Indus water treaty suspension act of war by India, claims Pakistan सिंधू जल करार स्थगितीने पाकिस्तानला खरा हादरा

    सिंधू जल करार स्थगितीने पाकिस्तानला खरा हादरा; म्हणूनच पाकिस्तानी सरकारच्या तोंडी आली युद्धाची भाषा!!

    Indus water

    सिंधू जल करार करून सिंधूचे पाणी रोखाल, तर ते युद्ध समजू; पाकिस्तानची भारताला धमकी!!


    नाशिक : पहलगाम मधल्या हिंदू हत्याकांडानंतर भारताने पाकिस्तानवर वेगवेगळे कठोर निर्बंध लादले. त्यामध्ये पंडित नेहरूंनी 1960 मध्ये पाकिस्तान बरोबर केलेला सिंधू जल करार मोदी सरकारने स्थगित केला. मात्र त्यामुळे पाकिस्तानला खरा हादरा बसला. पाकिस्तानी सरकारचा प्रचंड संताप झाला. भारताविरुद्ध आगपाखड करत पाकिस्तानच्या शहाबाज शरीफ सरकारने भारताला नवी धमकी दिली. सिंधू जल करार रद्द करून पाकिस्तानच्या हक्काचे सिंधू नदीचे पाणी रोखाल, तर भारताने पाकिस्तान विरुद्ध युद्ध पुकारले असा त्याचा अर्थ काढून भारताचा मुकाबला करू, अशी धमकी पाकिस्तानी सरकारने भारताला दिली. त्याचबरोबर पाकिस्तानने वाघा बॉर्डर बंद करून टाकली. भारताबरोबरचा व्यापार थांबविला. पाकिस्तान मधल्या भारतीय हायकमिशन मधले अधिकारी आणि कर्मचारी कमी करायला सांगितले.Indus water treaty suspension act of war by India, claims Pakistan

    पाकिस्तानी दहशतवाद्यांनी पहलगाम हल्ला केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अध्यक्षतेखाली काल रात्रीच कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेयर्सची बैठक झाली. या बैठकीत मोदी सरकारने काही कठोर निर्णय घेतले. भारताने राजनैतिक पाऊल उचलत पाकिस्तान्यांचे व्हिसा रद्द केले. त्यांना ७२ तासांमध्ये भारत सोडायला सांगितले. सगळ्यात महत्त्वाचा सिंधू जल करार स्थगित केला. अटारी बॉर्डर बंद केली. पाकिस्तानी हायकमिशन मधले अधिकारी आणि कर्मचारी यांच्यात कपात केली. पाकिस्तानात गेलेल्या भारतीयांना लवकर परत येण्याच्या सूचना केल्या.



    या पार्श्वभूमीवर पाकिस्तान मध्ये पंतप्रधान शहाबाज शरीफ यांनी इथल्या कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटी अफेयरची बैठक घेतली. त्यामध्ये पाकिस्तानचा लष्कर प्रमुख असीम मुनीर हजर होता. त्या बैठकीत सगळ्यांनी भारताविरुद्ध आगपाखड केली. भारताने पहलगाम हल्ल्यावरचा ठपका पाकिस्तानवर ठेवणे बंद करावे. सिंधू जल करार स्थगित करून भारताने पाकिस्तानात येणारे सिंधू नदीचे पाणी बंद केले, तर ते भारताने पाकिस्तान विरुद्ध पुकारलेले युद्ध समजून पाकिस्तान भारताचा मुकाबला करेल, अशी धमकी पाकिस्तानी सरकारने दिली.

    पहलगाम मधल्या हिंदू हत्याकांडात पाकिस्तानचा कोणताही हात नसल्याचा दावा त्या देशाच्या सरकारने केला. पाकिस्तान मार्गे अन्य देशांशी होणारा भारताचा व्यापार स्थगित केला. वाघा बॉर्डर बंद केली. भारतीयांना व्हिसा देण्याची प्रक्रिया थांबवली. पण त्यातून शीख नागरिकांना मुद्दामून वगळले.

    या सगळ्या निर्णयातून पाकिस्तानने भारताला राजनैतिक पातळीवर प्रत्युत्तर दिले‌. यात फारसे आश्चर्य वाटण्यासारखे किंवा अनपेक्षित असे काही नव्हते.

    पण सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे भारताने सिंधू जल करार स्थगित केला, याचे गांभीर्य ओळखून पाकिस्तानने त्या मुद्द्याला ताबडतोब युद्धाचे स्वरूप दिले. भारताचा मुकाबला करायची धमकी दिली. याचा अर्थ भारताच्या या निर्णयाचा पाकिस्तानला खरा हादरा बसला, हे स्पष्ट झाले.

    – सिंधू जल करारात पाकिस्तानी पोपटाचे प्राण

    सिंधू जल करारात खरं म्हणजे पाकिस्तानी पोपटाचे प्राण अडकलेत. कारण सिंधू मधले पाणी ही पाकिस्तानची जलसंजीवनी आहे. तिच्या पाण्यावर पाकिस्तानचे सगळे जीवन अवलंबून आहे. सिंधू जल करार स्थगित करून भारताने सिंधू नदीचे पाणी पाकिस्तानात जाण्यापासून रोखले, सिंधू नदीचे पाणी भारतातल्या वेगवेगळ्या मार्गांनी वळविले, तर पाकिस्तानात पाण्याचे प्रचंड दुर्भिक्ष्य होईल. पाकिस्तान कायम तहानलेला राहील. पाकिस्तानचे शेती उत्पन्न घटेल. पाकिस्तानचे वाळवंटीकरण वेगाने होईल. लाहोर, कराची, मुलतान या मोठ्या शहरांचा पाणीपुरवठा बंद होईल. पाकिस्तान मधले सगळे जलविद्युत प्रकल्प बंद पडतील. ही भीती वाटल्यामुळेच पाकिस्तानी सरकारच्या तोंडी लगेच युद्धाची भाषा आली. पाकिस्तानातल्या कॅबिनेट कमिटी अन सिक्युरिटी अफेअर्सच्या बैठकीत असीम मुनीर हजर असल्यामुळे शहाबाज शरीफ सरकारला भारताशी युद्ध करायची धमकी द्यावी लागली.

    पण पाकिस्तानने भारताशी थेट युद्ध करायची धमकी देणे निराळे आणि ती प्रत्यक्षात अंमलात आणणे निराळे. कारण भारताने आत्तापर्यंत जाहीररित्या चार युद्धे लढली. ती सगळी पाकिस्तान हरला. म्हणून तर “ऑपरेशन टोपाज” सारख्या कारस्थानांना जन्म देऊन भारताविरुद्ध “थाउजंड कटचे” युद्ध त्याला लढावे लागले. पण आता त्यातही अपयशाचा सामना करण्याखेरीज दुसरा पर्याय उरला नसल्याचे दहशतवादी पाकिस्तानच्या नशिबी आले.

    Indus water treaty suspension act of war by India, claims Pakistan

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    दहशतवाद्यांनी धर्म विचारून हिंदूंचे केले हत्याकांड; तरीही लिबरल पुरोगाम्यांचे हिंदूंच्या विरोधातच फुत्कार!!

    काश्मीरमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी ‘राज्य आपत्ती व्यवस्थापन’च्या हेल्पलाइनवर संपर्क साधण्याचे आवाहन

    Raj Thackeray : महाराष्ट्रात दुसरी-तिसरी कोणती भाषा चालणार नाही महाराष्ट्रात फक्त मराठीच चालणार – राज ठाकरे