• Download App
    इंदुरीकर महाराजांनी पुत्ररत्न प्राप्तीबाबत केलेल्या विधानाप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात आज होणार सुनावणी । Indurikar Maharaj's statement regarding receipt of Putra Ratna will be heard in Aurangabad bench today

    इंदुरीकर महाराजांनी पुत्ररत्न प्राप्तीबाबत केलेल्या विधानाप्रकरणी औरंगाबाद खंडपीठात आज होणार सुनावणी

    संगमनेर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्याध्यक्ष अ‍ॅडव्होकेट रंजना गवांदे यांनी नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली होती. Indurikar Maharaj’s statement regarding receipt of Putra Ratna will be heard in Aurangabad bench today


    विशेष प्रतिनिधी

    औरंगाबाद : इंदुरीकर महाराज नेहमी त्यांच्या वादग्रस्त विधानामुळे चर्चेत असतात.दरम्यान इंदुरीकर महाराजांनी पुत्ररत्न प्राप्तीबाबत केलेल्या विधानाप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात आज सुनावणी होणार आहे.इंदुरीकर महाराजांनी एका कीर्तनातून पुत्ररत्न प्राप्तीच्या संदर्भाने जाहीरपणे विधान केले होते.त्याविरोधात संगमनेर येथील अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या राज्याध्यक्ष अ‍ॅडव्होकेट रंजना गवांदे यांनी नगरच्या जिल्हा शल्यचिकित्सकांकडे तक्रार केली होती.



    दरम्यान स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंधक कायद्यान्वये म्हणजे पीसीपीएनडीटी ऍक्टनुसार , संगमनेरच्या प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालयात गर्भधारणापूर्व व प्रसवपूर्व निदानंतंत्र लिंग निवडीस प्रतिबंध कायद्याच्या कलम २८ नुसार तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तक्रार केली.

    न्यायालयाने इंदुरीकर महाराज यांना समन्स काढण्याचे आदेश दिले आहे.दरम्यान त्याविरोधात इंदुरीकर महाराजांनी जिल्हा न्यायालयात धाव घेत पुनर्विलोकन अर्ज दाखल केला होता. परंतु जिल्हा न्यायालयाने पुनर्विलोकन अर्ज मंजूर करत प्रथम वर्ग न्यायालयाचा आदेश रद्द केला.दरम्यान या विरोधात रंजना पगारे- गवांदे यांनी औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे.आज त्यावर औरंगाबाद खंडपीठात सुनावणी होणार आहे.

    Indurikar Maharaj’s statement regarding receipt of Putra Ratna will be heard in Aurangabad bench today

    महत्त्वाच्या बातम्या

    Related posts

    Bachchu Kadu : बच्चू कडू आज मुख्यमंत्र्यांशी चर्चा करणार; चर्चा अयशस्वी ठरल्यास ‘रेल रोको’चा इशारा

    Mazi Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना लवकरच ऑक्टोबरचा लाभ मिळणार; 410.30 कोटींचा निधी वितरीत करण्यास मान्यता

    Nilesh Ghaiwal, : लंडनमध्ये नीलेश घायवळचा ठावठिकाणा सापडला; यूके हाय कमिशनकडून पुणे पोलिसांना माहिती