काही महिन्यांपूर्वी आपल्या कीर्तनात मुलाच्या जन्मावरुन केलेल्या विधानामुळे इंदुरीकर महाराज चांगलेच अडचणीत आले होते.Indorikar Maharaj in trouble again due to controversial statement; Read exactly what Maharaj said?
विशेष प्रतिनिधी
नाशिक : कीर्तनकार इंदुरीकर महाराज म्हणल की चर्चेचा विषय. इंदुरीकर महाराजांचे कीर्तन ऐकण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गर्दीही करत असतात. ते आपल्या कीर्तनामुळे नेहमी चर्चेत असतात.काही महिन्यांपूर्वी आपल्या कीर्तनात मुलाच्या जन्मावरुन केलेल्या विधानामुळे इंदुरीकर महाराज चांगलेच अडचणीत आले होते.
त्यांच्याविरोधात गुन्हाही दाखल झाला होता. त्यानंतर कोर्टाने त्यांची या प्रकरणातून सुटकाही केली. आता हे प्रकरण वरिष्ठ कोर्टात गेले आहे.
दरम्यान आता नाशिकमध्ये झालेल्या इंदुरीकर महाराजांच्याकीर्तनाचा एक व्हिडीओ आता सध्या चर्चेत आहे. या कीर्तनात इंदुरीकर महाराज कोविड प्रतिबंधक लसीकरणावर बोलले आहेत. महाराज म्हणाले की , मी लस घेतली नाही आणि घेणारही नाही .
नेमकं काय म्हणाले इंदुरीकर महाराज ?
नाशिकमध्ये नुकतेच इंदुरीकर महाराजांचे एक कीर्तन झाले. त्यात ते म्हणतात, की “प्रत्येक माणसाची ‘इम्युनिटी पाॅवर’ वेगवेगळी असते. प्रत्येकाची मेंदूची क्षमता वेगवेगळी आहे. मी तर कोरोना लस घेतलेली नाहीये आणि घेणारही नाही. काही होतच नाही, तर घेऊन काय करणार.. कोरोनावर एकच औषध, मन खंबीर ठेवा.!”इंदुरीकर महाराजांच्या या विधानावरुन नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे.
Indorikar Maharaj in trouble again due to controversial statement; Read exactly what Maharaj said?
महत्त्वाच्या बातम्या
- मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दिले निर्देश ; म्हणाले – राज्यात ३० नोव्हेंबरपर्यंत शंभर टक्के लसीकरण करा
- अयोध्येतला दीपोत्सव रामायण चित्ररथांनी सजणार; आठ लाख लोकप्रतिनिधींना योगींचे सहभागाचे आवाहन
- डेंग्यू नियंत्रणासाठी केंद्र सरकार कठोर, सर्वाधिक प्रभावित नऊ राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये पाठवली उच्चस्तरीय पथके
- अभिनेत्री सारा अली खानने घेतले केदारनाथचे दर्शन; जान्हवी कापूरसुद्धा होती सोबत; हिंदू- मुस्लिम ऐक्याचे दर्शन