• Download App
    अल्पसंख्याकांसाठी भारत असुरक्षित नव्हे, तर सर्वोत्तम; जागतिक अहवालात प्रशंसा India’s Ist report evaluating treatment of minorities by nations which puts India at the top.

    अल्पसंख्याकांसाठी भारत असुरक्षित नव्हे, तर सर्वोत्तम; जागतिक अहवालात प्रशंसा

    वृत्तसंस्था

    नवी दिल्ली : 2014 नंतर भारतात अल्पसंख्यांक असुरक्षित झाल्याची आवई उठविणाऱ्या लिबरल्सला एका आंतरराष्ट्रीय अहवालातून जोरदार चपराक बसली आहे. कारण अल्पसंख्याकांसाठी भारत सर्वात सुरक्षित देश असल्याचे या अहवालात स्पष्ट नमूद करण्यात आले आहे. India’s Ist report evaluating treatment of minorities by nations which puts India at the top.

    हिंदू बहुसंख्य असलेल्या भारतात अल्पसंख्याकांची संख्या देखील मोठ्या प्रमाणावर आहे. अल्पसंख्याकांच्या हितांचे रक्षण करण्यासाठी भारतीय संविधानात महत्वपूर्ण तरतुदी करण्यात आल्या आहेत. याबाबत आता एका जागतिक अहवालात भारताचे कौतुक करण्यात आले असून, भारत हा अल्पसंख्याकांसाठी सर्वोत्तम देश असल्याचे या अहवालात स्पष्ट करण्यात आले आहे.

    भारताला अग्रस्थान

    इतर कोणत्याही देशांपेक्षा भारत हा अल्पसंख्याकांसाठी सर्वोत्तम देश असून, भारतात अल्पसंख्याकांवर कोणतीही बंधने लादण्यात येत नाहीत, असे “सेंटर फॉर पॉलिसी ॲनालिसिस” या संशोधन संस्थेने जारी केलेल्या अहवालात म्हटले आहे. या संस्थेने अनेक देशांतील धार्मिक अल्पसंख्याकांशी संबंधित एक अहवाल तयार केला असून, या अहवालात भारताला अग्रस्थान देण्यात आले आहे.

    काय सांगतो अहवाल?

    • अल्पसंख्याकांच्या सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्कांच्या संवर्धनासाठी भारतीय राज्यघटनेत विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत. अशा तरतुदी जगातील इतर कोणत्याही देशात नाहीत.
    • भारत हा जगातील एकमेव असा देश आहे जिथे कोणत्याही धर्माच्या नागरिकांवर कोणतेही बंधन लादले जात नाही.
    • भारताचे अल्पसंख्याकांसाठी असलेले हे धोरण संयुक्त राष्ट्रसंघाद्वारे इतर देशांसाठी एक मॉडेल म्हणून वापरले जाऊ शकते.
    • भारताचे हे मॉडेल एकतेत विविधतेला प्रोत्साहन देणारे आहे.

    India’s Ist report evaluating treatment of minorities by nations which puts India at the top..

    महत्वाच्या बातम्या

    Related posts

    state government : संरक्षण दल अन् राज्य सरकार यांच्यात महत्त्वपूर्ण समन्वय बैठक

    Devendra Fadnavis : स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यामुळे भारतीय स्वातंत्र्यलढ्याला कलाटणी मिळाली – देवेंद्र फडणवीस

    Operation sindoor : संसदेच्या विशेष अधिवेशनाच्या काँग्रेसच्या मागणीला शरद पवारांचा खोडा!!