कोथरूडकडून कर्वेनगर परिसरातून जातांना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसले, मात्र…
प्रतिनिधी
पुणे : भारतीय क्रिकेट संघाचा अष्टपैलू खेळाडू केदार जाधव याचे वडील महादेव जाधव (वय-८५) हे आज सकाळपासून बेपत्ता झाले आहेत. पुणे पोलिसांकडे यासंदर्भात तक्रार दाखल करण्यात आली आहे. Indian Cricket Player Kedar Jadhavs father Mahadev Jadhav has gone missing
केदार जाधवचे कुटुंबीय पुण्यातील कोधरूड परिसरात राहतात. महादेव जाधव हे आज सकाळी साडेअकरा वाजेच्या सुरमारास ते घरातून बाहेर पडले होते. मात्र त्यानंतर अद्याप दिवसभर त्यांच्याशी संपर्क होऊ शकलेला नाही. त्यांचा फोनही बंद येत असल्याने कुटुंबीयांनी पोलिसांत धाव घेतली आहे.
महादेव जाधव यांना स्मृतीभ्रंशाचा आजार आहे, त्यामुळे त्यांना कोणीही पाहिल्यास त्वरीत संपर्क साधण्याचे आव्हान जाधव कुटुंबियांकडून करण्यात आले आहे. त्यांना बर्याचशा गोष्टी लक्षात रहात नाहीत. त्यामुळे जाधव कुटुंबिय हे त्यांना घराबाहेर पाठवत नाहीत.
याबाबत पोलिसांनी सांगितले की, ” कोथरूड भागातील अनेक CCTV फूटेज तपासणी केली आहे. यात कोथरूडकडून कर्वेनगर परिसरातून जातांना महादेव जाधव हे दिसत आहेत. मात्र त्याच्या पुढे ते कुठे गेले हे समजू शकले नाही, त्यांचा शोध सुरू आहे.”
Indian Cricket Player Kedar Jadhav father Mahadev Jadhav has gone missing
महत्वाच्या बातम्या
- महागाई डायन बेडरूममध्ये…, युवक काँग्रेस अध्यक्ष श्रीनिवास यांची स्मृती इराणींवर अश्लाघ्य शब्दांत टीका
- उत्तरप्रदेश : मानव-पक्षी मैत्रीचा विचित्र शेवट; जखमी अवस्थेतील ‘सारस’ घरी आणून १३ महिने जीव लावला अन्
- राहुलजींकडून सावरकरांचा अपमान; ठाकरेंनी कान टोचले, भाजप – शिवसेनेने सुनावले, तर भुजबळांनी पण डिवचले!!; ठाकरे – काँग्रेस काय करणार??
- पुण्याचे माजी महापौर मुरलीधर मोहोळ यांच्या नावाने बांधकाम व्यावसायिकाला मागितली तीन कोटींची खंडणी; दोघांना अटक