वृत्तसंस्था
मुंबई : बॉलिवूडचा सुपरस्टार अक्षय कुमार हा कायमच विविध कारणांनी चर्चेत असतो. बॉलिवूडमधील आघाडीचा कलाकार म्हणून त्याला ओळखले जाते. पण त्याच्याकडे कॅनडाचे नागरिकत्व असल्याने अनेकदा टीका झाली आहे. पण आता अखेर अक्षय कुमारला भारताचे नागरिकत्व मिळाले आहे. त्याने स्वत: पोस्ट करत चाहत्यांना ही गुडन्यूज दिली.
अक्षय कुमारने स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ट्विटरवर एक ट्वीट केले आहे. त्यात अक्षयने भारतीय नागरिकत्व प्राप्त झाल्याची गुडन्यूज चाहत्यांबरोबर शेअर केली आहे. “मन आणि नागरिकत्व दोन्हीही हिंदुस्तानी. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा. जय हिंद”, असे कॅप्शन त्याने या फोटोला दिले.
आणखी वाचा
“तुम्ही मैत्रिणीच्या पतीशी लग्न केलं?”, नेटिझन्सच्या प्रश्नावर स्मृती इराणींचं सडेतोड उत्तर; म्हणाल्या, “माझी बदनामी…”
“हुकूमशाही सरकारविरोधात रस्त्यावर उतरा”, सरन्यायाधीश चंद्रचूड असं म्हणाले? सर्वोच्च न्यायालयाने सांगितले.
अक्षय कुमारला भारतीय नागरिकत्व प्राप्त झाल्यानंतर सिनेसृष्टीतील अनेकांनी त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. तर अक्षयच्या काही चाहत्यांनी ‘ट्रोल करणाऱ्यांची तोंड कायमची बंद झाली’, अशा कमेंट करत त्याचे अभिनंदन केले आहे.
अक्षय कुमारकडे याआधी कॅनडाचं नागरिकत्व होते. अक्षयच्या कॅनेडियन नागरिकत्वावरुन त्याला कॅनडा कुमार अशी टीकाही त्याच्यावर करण्यात आली होती. त्यावेळी अक्षयने कॅनेडियन नागरिकत्व का स्वीकारले, याबद्दल स्पष्टीकरण दिले होते.
अनेक वर्षांपूर्वी माझे चित्रपट चांगले चालत नव्हते. माझे जवळपास १४-१५ चित्रपट बॉक्स ऑफिसवर आपटले. त्यावेळी मला असे वाटलं की मी कुठेतरी दुसरीकडे काम करायला हवे. यानंतर मी माझ्या कॅनडामध्ये राहणाऱ्या मित्राला फोन केला. त्यावेळी त्याने मला कॅनडामध्ये स्थायिक हो असा सल्ला दिला. हल्ली बरेच लोक कामाच्या निमित्ताने कॅनडामध्ये येत आहेत आणि त्यातील बहुतांश भारतीय आहेत. त्यानंतर मला असं वाटलं की माझे नशीब मला साथ देत नाही. त्यासाठी मला काही तरी करणं गरजेचे आहे. मी तिथे कॅनडामध्ये गेलो. नागरिकत्वासाठी अर्ज केला आणि ते मिळाले, असे अक्षयने त्यावेळी सांगितले होते. पण आता मात्र अक्षयला भारतीय नागरिकत्व प्राप्त झाले आहे.
Indian citizenship to Akshay Kumar
महत्वाच्या बातम्या
- Independence Day : पंतप्रधान मोदी आज लाल किल्ल्यावरून राष्ट्राला संबोधित करणार, कोट्यवधी नागरिकांचे लक्ष भाषणाकडे
- हिमाचलमध्ये पावसामुळे प्रचंड विध्वंस, आतापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांचा मृत्यू
- स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी देशाला केले संबोधित
- योगींच्या यूपीत पाकिस्तान झिंदाबादच्या घोषणा पडल्या 1 कोटी रुपयांच्या महागात!!