लष्करातील सैन्याला दुधाचा अन् धान्याचा प्रामुख्याने पुरवठा करणा-या देशातील मानाच्या लष्कराच्या शेती आणि दुग्धशाळा आता इतिहास जमा होणार आहे. Indian Army closed the British era milk dairy
विशेष प्रतिनिधी
पुणे : लष्करातील सैन्याला दुधाचा अन् धान्याचा प्रामुख्याने पुरवठा करणा-या देशातील मानाच्या लष्कराच्या शेती आणि दुग्धशाळा आता इतिहास जमा होणार आहे. निवृत्त लेफ्टनंट जनरल दत्तात्रय शेकटकर यांच्या समितिने केलेल्या शिफारसीनुसार लष्कराचे हे प्रकल्प बंद करण्याचा निर्णय संरषण मंत्रालयाने घेतला आहे. दिल्ली कॅन्टोन्मेट येथे झालेल्या एका शिस्तबद्ध समारंभात देशातील जवळपास ३९ प्रकल्प बंद करण्यात आले. यात जवळपास २५ हजार पशुधन आहेत. तर शेतीवर जवळपास २८० कोटी रुपये खर्च होत होता.
ब्रिटीशांच्या काळात सैन्याला धान्याचा आणि दुधाचा पुरवठा करण्याच्या हेतूने स्वातंत्र्यापूर्वी १ फेब्रुवारी १८८९ रोजी पहिली लष्करी शेती आणि दुग्धशाळा अलाहाबाद येथे तयार करण्यात आली होती. स्वातंत्र्य मिळेपर्यंत म्हणजेच १९४७ मध्ये त्यांच्या संख्येत ही वाढ झाली. जवळपास १३२ वर्ष सेवा या फार्मनी लष्कराला दिली. मात्र, काळाच्या ओघात या मिलीटरी फार्मचा वापर कमी झाला. मात्र त्या प्रमाणात खर्चात मोठी वाढ झाली होती.
लष्कराच्या या यंत्रणेकडे मोठ्या प्रमाणात जमिनी आहेत. शिवाय त्यांच्यावरील खर्च वाढल्याने हा खर्च कमी करण्याच्या हेतूने शेकटकर कमीटीने हे फार्म बंद करण्याच्या सुचना दिल्या होत्या. फार्म वर खर्च होणारी रक्कम आणि आणि जमिनींचा वापर इतर महत्वाच्यागोष्टींसाठी करण्याची सुचनाही त्यांनी दिली होती. त्यानुसार संरक्षण मंत्रालयाने २०१७ मध्ये ते मिलीटरी फार्म बंद करण्याचे आदेश दिले. मात्र, येथील कर्मचाऱ्यांन हे फार्म बंद करण्याबाबत विरोध केला आणि उच्च न्यायालयाने केंद्र सरकारच्या या निर्णयाला स्थगिती दिली होती. अखेरीस सर्व प्रक्रिया पूर्ण करत ३० मार्च २०२२ रोजी लष्कराच्या ३९ लष्करी शेती फार्म आता बंद करण्यात आले आहेत.
Indian Army closed the British era milk dairy
महत्त्वाच्या बातम्या
- सोनियांच्या उपस्थितीत आज काँग्रेसची बैठक; संसद अधिवेशनात सरकारला घेरण्याची तयारी
- गोरखनाथ मंदिर हल्ला; हल्लेखोराला १४ दिवस पोलीस कोठडी
- युक्रेनच्या बुचा शहरात रशियाचा भयावह नरसंहार; चर्चच्या स्मशानभूमीजवळ पडले मृतदेहाचे खच
- श्रीलंकेच्या पंतप्रधानांचा अखेर राजीनामा ; नव्या मंत्रिमंडळाची लवकरच होणार स्थापना